मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या डेटावर हॅकर्सची नजर? या 7 पद्धतींनी डेटा ठेवा सुरक्षित

तुमच्या डेटावर हॅकर्सची नजर? या 7 पद्धतींनी डेटा ठेवा सुरक्षित

युजर्सचा डेटा हॅक झाल्यास बँक खात्यातून चोरी होणं, सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

युजर्सचा डेटा हॅक झाल्यास बँक खात्यातून चोरी होणं, सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

युजर्सचा डेटा हॅक झाल्यास बँक खात्यातून चोरी होणं, सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : इंटरनेट सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण त्यासोबत आपल्या डेटाच्या सुरक्षिततेचाही धोका वाढला आहे. हॅकिंगची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युजर्सचा डेटा हॅक झाल्यास बँक खात्यातून चोरी होणं, सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

ओटीपी (OTP)-

कोणत्याही व्यक्तीने एखाद्या कंपनी किंवा बँकेतून बोलत असल्याचं सांगत गोपनीय माहितीची विचारणा केल्यास सावध व्हा. बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ओटीपी, यूपीआय आयडी, लॉगइन पासवर्ड कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका. अनेकदा हॅकर्स याच माहितीच्या आधारे ऑनलाईन फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात.

स्ट्राँग पासवर्ड -

कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा पासवर्ड अतिशय स्ट्राँग ठेवा. त्यात स्पेशल कॅरेक्टर, नंबर्स, लहान-मोठ्या अक्षरांचा वापर करा. या सर्वांसह पासवर्ड 10 कॅरेक्टर्सचा असावा. टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ऑन ठेवा. सर्व प्लॅटफॉर्म्सवर पासवर्ड वेगवेगळा ठेवा. पासवर्ड मोबाईल, लॅपटॉप किंवा क्लाउडवर एकाच सिंगल फाईलमध्ये सेव्ह करून ठेवू नका.

वेरिफिकेशन -

कोणताही ईमेल आल्यास, त्याचा टू एड्रेस वेरिफाय करा. विना ईमेल वेरिफाय केल्याशिवाय, अटॅचमेंट ओपन करण्यापूर्वी सिस्टमवर मालवेअर येऊ शकतो. त्यामुळे हॅकर सिस्टममधून स्टोर डेटा मिळवू शकतो.

तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय का? अकाउंट हॅक होण्याची शक्यता; पाहा या वर्षातील सर्वात बिनकामाचे 20 पासवर्ड

url -

सोशल मीडिया मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आलेल्या कोणत्याही डिल्स, ऑफर्स, डिस्काउंट्स किंवा स्किम ओपन करण्यापूर्वी त्याचा यूआरएल चेक करा. उदा. जर पेटीएमवर कोणत्याही ऑफरची लिंक आल्यास, सर्वप्रथम त्या वेबसाईटचा यूआरएल चेक करा. ओरिजनल पेटीएमचाही यूआरएल तपासा. यूआरएल पेटीएमडॉटकॉमचा असेल, तरच ओपन करा. अन्यथा ओपन करू नका.

चॅटवर पासवर्ड देऊ नका -

कोणत्याही कुटुंबातील सदस्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इतर गोपनीय गोष्टींची माहिती थेट Whatsapp, text message किंवा इतर सोशल मीडिया मेसेजवर सांगू नका. अशी माहिती शक्यतो कोणालाही देऊ नये. परंतु दिल्यास ही माहिती तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर द्या. उदा. डेबिट कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीवीवी, नाव एकत्र पाठवू नका किंवा फोटो काढून पाठवू नका.

Mobile App डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा; अन्यथा खाली होऊ शकतं बँक अकाउंट

चॅटची बॅकअप फाईल ज्या कोणत्या लोकेशनवर स्टोर होते, ते लोकेशन किंवा फोल्डर इतर ऍप्ससह शेअर होऊ शकतं आणि ते रीडही केलं जाऊ शकतं. एखाद्यावेळी डेटा हॅक झाल्यास ही संपूर्ण एकत्रित पाठवलेली माहिती हॅकर्सला एकत्रच सहजरित्या मिळू शकते.

ऍप्स परमिशन -

ऍप्स डाउनलोड करताना, कमीत कमी गरजेचेचं ऍप डाउनलोड करा. अनेक ऍप्स परमिटेड डेटा आपल्या सर्व्हरवर नियमितपणे स्टोर करतात आणि ऍप्सचा डेटा चोरी होण्याचीही शक्यता असते. ऍपचा डेटा चोरी झाल्यास, तुमचा सेव्ह झालेला डेटाही लिक होऊ शकतो. तसंच कोणतेही ऍप डाउनलोड करताना त्यासोबत धोकादायक मालवेअर डाउनलोड होण्याची भीती असते. त्यामुळे हवे तेच, गरजेचं ऍप डाउनलोड करा.

इनकॉग्निटो विंडो -

दुसऱ्याच्या मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करताना इनकॉग्निटो विंडोमध्येच इंटरनेटचा वापर करा आणि काम पूर्ण झाल्यावर लॉगआउट करा. त्याशिवाय विंडो बंद करायलाही विसरू नका. कोणत्याही फायनेंशियल वेबसाईटचा पासवर्ड सेव करू नका. अनसिक्योर्ड पब्लिक नेटवर्कवर इंटरनेट कनेक्ट करून फायनेंशियल ट्रान्झेक्शन करू नका.

First published:

Tags: Internet