मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय का? अकाउंट हॅक होण्याची शक्यता; पाहा या वर्षातील सर्वात बिनकामाचे 20 पासवर्ड

तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय का? अकाउंट हॅक होण्याची शक्यता; पाहा या वर्षातील सर्वात बिनकामाचे 20 पासवर्ड

NordPass ने 2020 मधील 200 अशा पासवर्डची लिस्ट जारी केली आहे, जे पासवर्ड सर्वात कॉमन आहेत. यात 20 क्रमांकापर्यंतचे पासवर्ड अतिशय सोपे, अतिशय कमकुवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वसाधारण हॅकरही काही सेकंदातच हे पासवर्ड क्रॅक करतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : पासवर्ड मॅनेजर सोल्यूशन देणारी फर्म NordPass ने 2020 च्या सर्वाधिक खराब पासवर्डची लिस्ट जारी केली आहे. यात एक पासवर्ड किती वेळा लीक झाला आहे आणि तो किती वेळा वापरण्यात आला आहे, याबाबतही माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, अधिकतर लोक पासवर्ड लक्षात राहण्यासाठी अतिशय सोप्या पासवर्डचा वापर करतात, पण लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपा ठेवलेला पासवर्ड सहजपणे क्रॅकही केला जातो. त्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होण्याची भीती असते.

सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड -

यावर्षीच्या सर्वाधिक पॉप्युलर लिस्टमध्ये 123456 आणि 123456789 हे दोन पासवर्ड आहेत. या लिस्टमध्ये देण्यात आलेले पासवर्ड एका सेकंदाहूनही कमी वेळेत क्रॅक केले जातात. 123456 शिवाय या लिस्टमध्ये picture1, password आणि 12345678 असे अतिशय सोपे पासवर्डही आहेत. picture1 या पासवर्डचा सर्वाधिक लोकांनी वापर केला आहे.

(वाचा - बाबो! रस्त्यावर पसरल्या 2000 आणि 500 च्या नोटा; पैसे लूटण्यासाठी तुफान गर्दी)

NordPass ने 2020 मधील 200 अशा पासवर्डची लिस्ट जारी केली आहे, जे पासवर्ड सर्वात कॉमन आहेत. यात 20 क्रमांकापर्यंतचे पासवर्ड अतिशय सोपे, अतिशय कमकुवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वसाधारण हॅकरही काही सेकंदातच हे पासवर्ड क्रॅक करतात.

1. 123456

2. 123456789

3. picture1

4. password

5. 12345678

6. 111111

7. 123123

8. 12345

9. 1234567890

10. senha

11. 1234567

12. qwerty

13. abc123

14. Million2

15. 000000

16. 1234

17. iloveyou

18. aaron431

19. password1

20. qqww1122

(वाचा - स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 25 तरुणींना ताब्यात घेतलं)

त्याशिवाय 123, omgpop, 123321, 654321 आणि qwertyuiop हे पासवर्डही सर्वाधिक कॉमन आहेत. पासवर्ड मॅनेजर सोल्यूशन देणारी फर्म NordPass ने याबाबत इशारा दिला आहे. जर तुम्हीही यापैकी कोणता पासवर्ड ठेवला असेल, तर तो त्वरित बदलण्याचं NordPass ने सांगितलं आहे. अशा कमकुवत, सोप्या पासवर्डमुळे कोणताही युजर सहजपणे हॅकिंगचा बळी ठरू शकतो.

अशाप्रकारच्या पासवर्डचा वापर करा -

पासवर्ड ठेवताना मिक्स्ड कॅरेक्टरचा वापर करा. अपरकेस, लोअरकेस, स्पेशल कॅरेक्टर मिळून एक रँडम पासवर्ड तयार करा. स्ट्राँग पासवर्डसाठी पासवर्ड जेनेरेटर टूलचाही वापर करू शकता, असं सांगण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Password