Mobile App डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा; अन्यथा खाली होऊ शकतं बँक अकाउंट

Mobile App डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा; अन्यथा खाली होऊ शकतं बँक अकाउंट

देशात ज्याप्रमाणात ऑनलाईन प्रणालीचा वापर वाढतो आहे, त्याच वेगात ऑनलाईन फसवणूकीचं प्रमाणही वाढतं आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांकडे फसवणूक करण्याचे पर्याय वाढत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : कोरोनामुळे अनेक जण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळतात. त्यामुळे अनेक शक्य असलेली कामं मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने केली जातात. ऑनलाईन शॉपिंगपासून ते बँकिंग ट्रान्झेक्शनपर्यंत अनेक कामं अ‍ॅपच्या माध्यमातून सहज करता येतात. पण देशात ज्याप्रमाणात ऑनलाईन प्रणालीचा वापर वाढतो आहे, त्याच वेगात ऑनलाईन फसवणूकीचं प्रमाणही वाढतं आहे. ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांकडे फसवणूक करण्याचे पर्याय वाढत आहेत. अनेक सामान्यांना या सायबर फ्रॉडचा फटकाही बसतो आहे. मोबाईल अ‍ॅपद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

खोटे बँकिंग अ‍ॅप -

अनेक जण बँकिंग अ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन ट्रान्झेक्शन करतात. परंतु सध्या गुगल प्ले स्टोरवर अनेक मोठ्या, प्रसिद्ध बँकांचे खोटे-बनावट अ‍ॅप उपलब्ध आहेत. चुकूनही असे अ‍ॅप डाउनलोड केल्यास, खात्यातून पैसे खाली होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही बँकेचं अ‍ॅप डाउनलोड करताना, संपूर्ण सावधगिरी बाळगून, योग्य ती पडताळणी करूनच डाउनलोड करा. कोणत्याही बँकेचं अ‍ॅप डाउनलोड केल्यास, त्यात दिलेल्या अटी-शर्ती बारकाईने वाचा. यात काही चुकीचं आढळल्यास, ते अ‍ॅप खोटं असू शकतं.

(वाचा - रिटायर्ड अधिकाऱ्याच्या खात्यातून 40 लाखांची चोरी; थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार)

ऑनलाईन शॉपिंग -

ऑनलाईन शॉपिंग करताना, सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. सायबर आरोपी अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या नावाने, अतिशय मिळत्या-जुळत्या वेबसाईट बनवतात. चुकून एखाद्या अशा बनावट साईटवरून खरेदी करून, ऑनलाईन पेमेंट केल्यास मोठ्या फसवणूकीची शक्यता आहे. त्यामुळे कधीही शॉपिंग करताना विश्वसनीय साईटचाच वापर करा.

(वाचा - स्मार्टफोन चार्ज करताना तुम्हीही या चुका करता का? होऊ शकतं मोठं नुकसान)

मोबाईलमध्ये गरज नसताना अ‍ॅप डाउनलोड करू नका -

ज्या मोबाईल अ‍ॅपची आवश्यकता नाही, ते अ‍ॅप मोबाईलमध्ये स्टोर करून ठेऊ नका. अनेकदा अ‍ॅप डाउनलोड करताना, त्यासोबत मालवेयरही डाउनलोड होतो. त्यामुळे तुमची खासगी माहिती सायबर आरोपींकडे सहजपणे पोहचू शकते. त्यामुळे नको असलेले अ‍ॅप मोबाईलमध्ये ठेऊ नका.

Published by: Karishma Bhurke
First published: December 13, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading