मुंबई, 9 डिसेंबर : देशातल्या अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडू लागली असून, त्याचा दैनंदिन कामांवरही परिणाम होतोय. थंडीच्या दिवसांत गाडी सुरू करणं मोठं कठीण असतं. गाडी सुरू केल्यानंतर ती चालवतानाही या काळात वेगवेगळ्या अडचणी येतात. हिवाळ्यात कारची काळजी कशी घ्यायची, याबाबतच्या काही टिप्स पाहू या. त्या अंमलात आणल्यास तुम्हाला हिवाळ्यात गाडी चालवताना कोणतीही अडचण येणार नाही.
लाईट : हिवाळ्यामध्ये तुमच्या गाडीला फॉग लाईट लावा. तसंच गाडीमधला हीटर व्यवस्थित सुरू आहे ना, याची खात्री करा.
इंजिन : गाडीची बॅटरी आणि इंजिन प्रामुख्याने थंड हवामानात प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे गाडी सुरू करताना अनेक समस्या उद्भवू शकतात. बॅटरी जुनी असेल, तर ती बदला. अन्यथा बॅटरीच्या सर्व केबल्स आणि त्यामधल्या पाण्याची पातळी तपासा. इंजिन तेल तपासा आणि आवश्यक असल्यास बदला. कारण कमी तापमानात द्रव गोठू शकतात.
ब्रेक : हिवाळ्यात बर्फाच्छादित भागात प्रवास करत असलात, तर गाडीचा ब्रेक लावताना अडचण येऊ शकते. अशा वेळी थंडीचा ऋतू सुरू होण्यापूर्वीच ब्रेक सर्व्हिस करा. कॅलिपर ब्रेक स्वच्छ करा आणि ग्रीस लावून घ्या.
टायर : हिवाळा सुरू होण्याआधी टायर्स चांगल्या स्थितीत आहेत की नाही, हे तपासा. कारण निसटत्या रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना घसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टायरमध्ये हवा व्यवस्थित आहे ना, हे तपासलं पाहिजे.
तुम्हीही CNG कार वापरता? मग चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, अन्यथा...
गाडीमध्ये टूलबॉक्स ठेवा : बर्याचदा अनेक जण गाडीतून टूलबॉक्स काढून बाहेर ठेवतात; मात्र हिवाळ्यात टूलबॉक्स हा गाडीमध्येच ठेवा. कारण दुर्दैवानं कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर हा टूलबॉक्स उपयोगी येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.