मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

तुम्हीही CNG कार वापरता? मग चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, अन्यथा...

तुम्हीही CNG कार वापरता? मग चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, अन्यथा...

तुम्हीही CNG कार वापरता? मग चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, अन्यथा...

तुम्हीही CNG कार वापरता? मग चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, अन्यथा...

देशात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजी कार्सची मागणी वाढली आहे. आता अनेक कंपन्या छोट्या कार्समध्ये सीएनजीचा पर्याय देत आहेत. सीएनजी कार्सना जास्त देखभाल करायची आवश्यकता भासत नाही. यामुळे भारतात सीएनजी कार्स खूप लोकप्रिय झाल्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 डिसेंबर: देशात पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजी कार्सची मागणी वाढली आहे. आता अनेक कंपन्या छोट्या कार्समध्ये सीएनजीचा पर्याय देत आहेत. सीएनजी कार्सना जास्त देखभाल करायची आवश्यकता भासत नाही. यामुळे भारतात सीएनजी कार्स खूप लोकप्रिय झाल्या आहेत. सीएनजी नसलेल्या कार्समध्येदेखील सीएनजी किट लावले जात आहे. यामुळे कारचे मायलेज वाढतं; मात्र सीएनजी कार्स ज्यांच्याकडे असतील, त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

सीएनजीवर आपली कार सुरू करू नये

आपली कार सुरू करताना नेहमी पेट्रोलवर सुरू केली पाहिजे. सीएनजीवर कार सुरू केल्याने नंतर इंजिनचं नुकसान होतं. आपल्या कारचं इंजिन पेट्रोलवर सुरू करून एक वा दोन किलोमीटर कार चालवावी. त्यानंतर सीएनजीवर स्विच करावं. असं केल्याने पुढील प्रवास सोपा होण्यासाठी इंजिन लुब्रिकेशनला मदत होते.

हेही वाचा: तुम्हीही फोनचं ब्ल्यूटूथ कायम ऑन ठेवता? मग असं राहा ब्लूबगिंगपासून सुरक्षित

स्पार्क प्लगकडे दुर्लक्ष करू नका

सीएनजी कारमध्ये स्पार्क प्लग खूप लवकर घासले जातात. स्पार्क प्लग वेळोवेळी तपासले पाहिजेत, गरज असल्यास बदलले पाहिजेत. याशिवाय काही पैसे वाचविण्यासाठी काही अन्य उपायही केले जाऊ शकतात. एक पद्धत अशी आहे, की पेट्रोलवर आधारित स्पार्क प्लगचा वापर सीएनजी वाहनांसाठी केला जावा. दुसरी पद्धत म्हणजे प्लगची मेटल टिप आणि स्पार्किंगच्या नेमक्या बिंदूमधलं अंतर कमी करणं. यामुळे काही पैसे वाचतील आणि ही एक टिकाऊ पद्धत आहे.

उन्हात कार पार्क करू नका

आपली कार सावलीत पार्क करावी. याचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे जेव्हा आपण कारमध्ये पुन्हा बसता तेव्हा कार तापलेली नसते. दुसरा फायदा म्हणजे सीएनजीचं बाष्पीभवन प्रतिबंधित होते. सीएनजी वायू स्वरूपात असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा वेगाने बाष्पीभवन होतं. सावलीत कार पार्किंग केल्याने बाष्पीभवन टळतं.

लीक टेस्टकडे दुर्लक्ष करू नका

कोणत्याही प्रकारची गळती टाळण्यासाठी सर्वप्रथम गॅसची टाकी पूर्ण भरू नका. गॅस गळतीचा वास येत असल्यास त्वरित कार बंद करा. सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा. मेकॅनिकने तपासल्यानंतरच गाडी पुन्हा सुरू करा.

सीएनजी मेंटेनन्सकडे दुर्लक्ष करू नका

सीएनजी कारची देखरेख व सर्व्हिसिंग टाळल्‍याने कारचं मोठं नुकसान होऊ शकतं. सीएनजी कार पैशांची बचत करते यात काही शंका नाही; पण देखरेखीकडे दुर्लक्ष महागात पडू शकतं. कार व्यवस्थित ठेवल्यारच ती चांगला परफॉर्मन्स देते. अनेक सीएनजी गाड्यांना आग लागण्यामागे देखरेखीत अनियमितता हे एक प्रमुख कारण आहे.

First published:

Tags: Car