मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कार लोन फेडल्यानंतर तातडीनं करा ‘हे’काम करा, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

कार लोन फेडल्यानंतर तातडीनं करा ‘हे’काम करा, अन्यथा बसू शकतो मोठा फटका

नवीन गाडी खरेदी करताना ग्राहक कर्ज घेतात, त्यामुळे गाडी घेण्यासाठी फायनान्स करणाऱ्या बँकेचं नाव आरसी बुकवर ‘हायपोथिकेशन’ म्हणून नोंदवलं जातं.

नवीन गाडी खरेदी करताना ग्राहक कर्ज घेतात, त्यामुळे गाडी घेण्यासाठी फायनान्स करणाऱ्या बँकेचं नाव आरसी बुकवर ‘हायपोथिकेशन’ म्हणून नोंदवलं जातं.

नवीन गाडी खरेदी करताना ग्राहक कर्ज घेतात, त्यामुळे गाडी घेण्यासाठी फायनान्स करणाऱ्या बँकेचं नाव आरसी बुकवर ‘हायपोथिकेशन’ म्हणून नोंदवलं जातं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: नवीन कार, गाडी खरेदी करण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक, फायनान्स कंपनी अनेकांना लोन अर्थात कर्ज देऊन मदत करते. पण तुम्हाला माहिती आहे का, कर्ज घेऊन कार, गाडी खरेदी केल्यास त्या गाडीच्या आरसी बुकवर बँकेचं किंवा संबंधित फायनान्स कंपनीचं नाव असतं. जेव्हा तुम्ही कर्जाची परतफेड करता, तेव्हा आरसी बुकवरील बँकेचं किंवा संबंधित फायनान्स कंपनीचं नाव काढून टाकणं गरजेचं असतं.

नवीन गाडी खरेदी करताना ग्राहक कर्ज घेतात, त्यामुळे गाडी घेण्यासाठी फायनान्स करणाऱ्या बँकेचं नाव आरसी बुकवर ‘हायपोथिकेशन’ म्हणून नोंदवलं जातं. जर तुम्हीही गाडी खरेदी करताना लोन घेतलं असेल, तर आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत.

तुम्ही गाडी खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करीत तुमचं लोन अकाउंट बंद केलं असेल, आणि तुम्हाला बँकेकडून ‘एनओसी’देखील मिळाली असेल, तर तुमचं काम इथंच संपलेलं नाही.

कारण केवळ एनओसी मिळाल्यानं काम पूर्ण होत नाही. तर, यानंतरही आणखी एक महत्त्वाची गोष्ट लोन अकाउंट बंद केल्यानंतर लगेचच करणं गरजेचं आहे. ती म्हणजे आरसी बुकवर ‘हायपोथिकेशन’ म्हणून नोंदवण्यात आलेलं बँकेचं नाव काढणं आवश्यक आहे.

आरसी बुकवरून असं काढा हायपोथिकेशन

वाहनाच्या आरसी बुकवरून हायपोथिकेशन काढणं खूप सोपं झालं आहे. या साठी आता आरटीओमध्ये जाण्याचा आणि लांब रांगेत उभं राहण्याचा त्रास पूर्वीसारखा राहिला नाही. आता तुम्ही parivahan.gov.in वर जाऊन तुमचं अकाउंट तयार करून आणि वाहन नोंदणी क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

आरटीओच्या वेबसाईटवरून जाऊन अकाउंट लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन सेवा ऑप्शनवर जावं लागेल. इथे तुम्हाला वाहनासंबंधित सेवांवर जावं लागेल, आणि हायपोथिकेशन टर्मिनेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करताना, तुम्हाला बँकेकडून प्राप्त एनओसी आणि फॉर्म 35 अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करावं लागेल.

ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट पावतीची प्रिंट आउट, मूळ आरसी बुक, पोल्युशन सर्टिफिकेट, गाडीच्या इन्शुरन्सची प्रत अशी कागदपत्रं तुमची कार ज्या आरटीओ कार्यालयांतर्गत नोंदणीकृत आहे, त्या आरटीओ कार्यालयाला स्पीड पोस्टनं पाठवावी लागतील. आरटीओमध्ये तुम्ही पाठवलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते, त्यानंतर आरटीओ तुम्हाला नवीन आरसी बुक तुमच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवतं.

दरम्यान, नवीन वाहन खरेदी करताना बहुतांश लोक बँकेकडून कर्ज घेतात. अशा स्थितीत वाहनाच्या आरसीबुकवर हायपोथिकेशन नोंदवलं जातं. त्यामुळे वाहनाची विक्री करणं अशक्य असते. वाहन विकायचं असेल, तर हायपोथिकेशन दूर करणं अत्यंत गरजेचं असते.

याशिवाय, जेव्हा तुम्ही शोरूममध्ये नवीन गाडी खरेदी करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला गाडीच्या किमतीच्या ब्रेकअपमध्ये हायपोथिकेशनचा चार्जदेखील लावलेला दिसतो. रेकॉर्डसोबतच तुमच्या गाडीच्या इन्शुरन्समध्येही त्याची नोंद असते.

अशावेळी वाहन कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला कार विकायची असेल, तर आधी हायपोथिकेशन रिमूव्हल करून घेणं फायद्याचं ठरतं. ही प्रक्रिया आता ऑनलाइन झाल्यामुळे ती पूर्ण करण्यासाठी लागणारा त्रास कमी झाला आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करणं तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल.

First published:

Tags: Car, Loan, Pay the loan