नवी दिल्ली, 13 जून : मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एक मोठी घोषणा केली आहे. 2025 मध्ये Windows 10 बंद करण्यात येण्याचं कंपनीने सांगितलं आहे. कंपनीने अपडेटेड Windows लाइफ सायकल फेस शीटमध्ये सांगितलं, की 14 ऑक्टोबर 2025 रोजी Windows 10 Home, Pro, Pro for Workstations, आणि Pro Education बंद केलं जाईल. म्हणजेच अमेरिका स्थित टेक कंपनी या तारखेपासून कोणतंही अपडेट आणि सिक्योरिटी फीचर जारी करणार नाही.
ज्यावेळी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 (Windows 10) लाँच केलं, त्यावेळी त्यांनी हे विंडोजचं शेवटचं वर्जन असल्याचं सांगितलं होतं. परंतु कंपनीच्या लेटेस्ट टीजरने या महिन्याच्या अखेरपर्यंत Windows 11 लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर एक नवा इव्हेंट लिस्ट केला आहे, जो 24 जून रोजी होणार आहे. इव्हेंटमध्ये कंपनी 'नेक्स्ट फॉर विंडोज' येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हायलाईट करेल. मायक्रोसॉफ्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.
मायक्रोसॉफ्ट बिल्ड 2021 इव्हेंटमध्ये कंपनीचे सीईओ सत्या नडेला (CEO Satya Nadella) यांनी नेक्स्ट जनरेशन विंडोज अपडेट गेल्या दशकातील सर्वात स्पेशल असेल, असं सांगितलं.
'लवकरच आम्ही डेव्हलपर्स आणि निर्मात्यांसाठी अधिक मोठी आर्थिक संधी अनलॉक करण्यासाठी गेल्या दशकातल्या विंडोजच्या सर्वात महत्त्वपूर्ण अपडेटपैकी एक शेअर करणार' असल्याचं नडेला यांनी सांगितलं. विंडोजच्या नेक्स्ट जनरेशनबाबत उत्साही असल्याचंही ते म्हणाले.
हे विंडोजचं नवं वर्जन 2025 हून अधिक काळापर्यंत चालू शकेल. मायक्रोसॉफ्ट लोकांना नवे ऑपरेटिंग सिस्टमवर मायग्रेट करण्यासाठी अॅडिशनल वेळ देईल.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.