जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 'सांगायला ऑकवर्ड वाटतंय पण...', विकिपीडियाने सर्व भारतीय युजर्सना पाठवला मेसेज

'सांगायला ऑकवर्ड वाटतंय पण...', विकिपीडियाने सर्व भारतीय युजर्सना पाठवला मेसेज

'सांगायला ऑकवर्ड वाटतंय पण...', विकिपीडियाने सर्व भारतीय युजर्सना पाठवला मेसेज

दिवसभरात तुम्ही जर विकिपीडियावर कोणतीही माहिती वाचलीत किंवा लिंक क्लिक केली असल्यास तुम्हालाही हा मेसेज दिसला असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : विकिपीडिया, गुगलवर किंवा कोणत्याही ब्राउझरमधून जेव्हा माहिती शोधली जाते तेव्हा अनेकदा विकिपीडियावर ती सापडते. विकिपीडियावर कोणीही माहिती लिहू शकतो आणि त्यात भर घालू शकतो. जगभरातील अनेक भाषांमध्ये इथं माहिती उपलब्ध आहे. आता याच माहितीसाठी विकिपीडियाने भारतीयांनी आर्थिक मदत करावी असं आवाहन केलं आहे. कोणताही व्यावसायिक हेतू नसलेल्या विकिपीडियाने भारतीय वाचकांकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. विकिपीडियाचे स्वातंत्र्य आणि ते व्यावसायिक होऊ नये यासाठी मदत करा असं म्हटलं आहे. विकिपीडिया ओपन केल्यानंतर किंवा विकिपीडियावरील कोणत्याही माहितीची लिंक ओपन केल्यानंतर सुरुवातीलाच एक मेसेज दिला जात आहे. यात किमान दिडशे रुपये तुम्ही दान केलेत तर तो तुमच्यासाठी एक महिन्याच्या कॉफीचा खर्च असेल. पण त्यामुळे आम्हाला खूप मदत होईल असंही विकिपीडियाने म्हटलं आहे. भारतातील वाचकांनो तुम्ही विकिपीडिया वापरता हे खूपच चांगलं आहे. खरंतर तुम्हाला सांगायला कसंतरी वाटत आहे पण या बुधवारी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही जर आधीच मदत केली असेल तर आभारी आहे. आम्ही काही विकत नाही पण हे सगळं डोनेशनवर अवलंबून आहे. किमान प्रत्येकी 1 हजार रुपये. मात्र, एकूण वाचकांपैकी फक्त 2 टक्के वाचकच मदत करतात. तुमची मदत विकिपीडियाच्या भरभराटीला हातभार लावेल असंही विकिपीडियाने म्हटलं आहे. विकिपीडियाने किमान 150 रुपये मदत मागितली आहे. त्याशिवाय 300, 500, 1000 ते 5000 किंवा तुम्हाला जितकी मदत करायची आहे तेवढी मदतही करू शकता. यासाठी डेबिट कार्ड तसेच नेट बॅंकिंग पेमेंटचा पर्यायही दिला आहे. सावधान! तुमच्याकडे असलेला Android फोन असू शकतो धोकादायक विकिपीडियावर सध्या 309 भाषांमध्ये माहिती मिळते. याला लँग्वेज व्हर्जन असंही म्हटलं जाते. यात सर्वाधिक माहिती इंग्लिश, केबुआनो, स्विडिश, जर्मन, फ्रेंच, डच या भाषांमध्ये आहे.  15 जानेवारी 2001 मध्ये सुरु कऱण्यात आलेला विकिपीडिया सध्या सर्वात मोठी रेफरन्स वेबसाइट म्हणून ओळखली जाते. तुमच्या फोनसाठी 24 Apps धोकादायक, गुगलने दिला Delete करण्याचा सल्ला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात