जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर का ब्लॉक होत नाहीत Screenshot; हे आहे कारण

WhatsApp वर का ब्लॉक होत नाहीत Screenshot; हे आहे कारण

WhatsApp वर का ब्लॉक होत नाहीत Screenshot; हे आहे कारण

कंपनीने View Once हे फीचरही लाँच केलं असून या मोडध्ये पाठवलेला फोटो, व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो डिलीट होतो. परंतु या View Once मोडमध्ये फोटोचे स्क्रिनशॉटही काढता येऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपने यासाठी डिटेक्शन फीचर दिलेलं नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 जुलै: WhatsApp आपल्या युजर्सला नेहमी वेगवेगळे अपडेट देत असतं. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Disappearing Messages फीचरही लाँच केलं होतं, ज्यात 7 दिवसांनंतर मेसेज डिलीट होतात. आता अ‍ॅप 24 तासांच्या फीचरवरही काम करत आहे. त्याशिवाय कंपनीने View Once हे फीचरही लाँच केलं असून या मोडध्ये पाठवलेला फोटो, व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो डिलीट होतो. परंतु या View Once मोडमध्ये फोटोचे स्क्रिनशॉटही काढता येऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपने यासाठी डिटेक्शन फीचर दिलेलं नाही. व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने याबाबत काही प्रश्नांची उत्तरं दिली आहे. View Once मोडमध्ये पाठवण्यात आलेल्या फोटोमध्ये स्क्रिनशॉट डिटेक्शन फीचर जोडण्यात आलेलं नाही. WABetaInfo नुसार, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला प्रोटेक्ट करण्यासाठी असं केल्याचं सांगण्यात आलं आहे. WABetaInfo ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अँड्रॉईड बीटा वर्जनमध्ये View Once फीचर जोडलं आहे, ज्यात चॅटमध्ये पाठवण्यात आलेला फोटो आणि व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर गायब होईल. हे फीचर कामाचं आहे, परंतु लोक याबाबत तक्रार करत आहेत, की यात फोटो आणि व्हिडीओ मिळालेला व्यक्ती स्क्रिनशॉट घेऊ शकतो आणि हे योग्य नाही. यावर WABetaInfo ने सांगितलं, की व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सला सुरक्षित ठेवण्यासाठी स्क्रिनशॉटला ब्लॉक किंवा नोटिफाय करण्याचं फीचर दिलेलं नाही. Online Fraud चा नवा प्रकार; कॅश ऑन डिलीव्हरीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक View Once फीचरचा वापर - युजर्सनी या फीचरचा योग्य वापर करावा आणि कोणत्याही वाईट परिस्थितीत अडकू नये असं यामागे व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे. WABetaInfo नुसार, अँड्रॉईड व्हॉट्सअ‍ॅपमध्ये विविध अ‍ॅप्स किंवा इतर पद्धतींचा वापर करुन, किंवा थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे स्क्रिनशॉट नोटिफिकेशनलाही धोका दिला जाऊ शकतो. मेसेज पाठवणाऱ्याला समजणारही नाही, की त्यांच्या फोटो-व्हिडीओचं रेकॉर्डिंग होत असेल. युजरला ज्यावेळी स्क्रिनशॉट ब्लॉक असल्याची माहिती मिळते किंवा असं नोटिफाय केलं जातं, त्यावेळी युजर खात्रीशीरपणे खासगी गोष्टी पाठवू शकतो, की या मीडिया फाईल्स थर्ड पार्टीसह शेअर केल्या जात नाहीत. परंतु फोनमध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे या स्क्रिनशॉट नोटिफिकेशनलाही धोका दिला जाऊ शकतो. तुमचं Facebook Account हॅक झाल्यास काय कराल? कसं कराल रिकव्हर, वाचा सोपी प्रोसेस फेक अ‍ॅप डिटेक्ट - धोकादायक अ‍ॅप्सला ब्लॉक करण्यासाठी WhatsApp काही पद्धतींवर काम करत असल्याचं WABetaInfo ने सांगितलं. परंतु ज्या लोकांना मेसेज येत आहेत, त्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. स्क्रिनशॉट डिटेक्शन फीचरऐवजी व्हॉट्सअ‍ॅपन युजर्सला सावध राहण्याचा सल्ला कंपनीकडून देण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात