मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Android Auto म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे फायदे आणि वापर

Android Auto म्हणजे काय, जाणून घ्या त्याचे फायदे आणि वापर

अँड्रॉइड ऑटोचा वापर करण्यासाठी फोनमध्ये अँड्रॉइड 6.0 (Android 6.0) किंवा त्यानंतरच्या जनरेशनची ऑपरेटिंग सिस्टिम अस्तित्त्वात पाहिजे. याशिवाय अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी गाडी (टचस्क्रीन, रोटरी नॉब किंवा टचपॅडसारखे कंट्रोल्स उपलब्ध असले पाहिजेत), आणि यूएसबी (USB) केबलचीही आवश्यक असते.

अँड्रॉइड ऑटोचा वापर करण्यासाठी फोनमध्ये अँड्रॉइड 6.0 (Android 6.0) किंवा त्यानंतरच्या जनरेशनची ऑपरेटिंग सिस्टिम अस्तित्त्वात पाहिजे. याशिवाय अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी गाडी (टचस्क्रीन, रोटरी नॉब किंवा टचपॅडसारखे कंट्रोल्स उपलब्ध असले पाहिजेत), आणि यूएसबी (USB) केबलचीही आवश्यक असते.

अँड्रॉइड ऑटोचा वापर करण्यासाठी फोनमध्ये अँड्रॉइड 6.0 (Android 6.0) किंवा त्यानंतरच्या जनरेशनची ऑपरेटिंग सिस्टिम अस्तित्त्वात पाहिजे. याशिवाय अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी गाडी (टचस्क्रीन, रोटरी नॉब किंवा टचपॅडसारखे कंट्रोल्स उपलब्ध असले पाहिजेत), आणि यूएसबी (USB) केबलचीही आवश्यक असते.

पुढे वाचा ...

  मुंबई, 27 जानेवारी : बहुतेक वाहन उत्पादक (auto manufacturers) आपल्या कारमध्ये इन्फोटेन्मेंट सिस्टम (infotainment systems) ऑफर करतात आणि अलीकडच्या काळात ही बाब अतिशय कॉमन झाली आहे. अगदी लहान हॅचबॅक कार्समध्येही (hatchback cars) अतिशय डिसेंट इन्फोटेन्मेंट सिस्टिम्स उपलब्ध आहेत. एकूणच काय तर, हाय-एंड सेडान (high-end sedans) किंवा एसयूव्ही (SUV) कारमध्ये एक लक्झरी फीचर (luxury feature) म्हणून सुरू करण्यात आलेली इन्फोटेन्मेंट सिस्टिम आता कार सेगमेंटमध्ये एकदम सामान्य बाब झाली आहे. ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये इन्फोटेन्मेंट सिस्टिम उपलब्ध नाहीत. मात्र, नवीन वाहनांमध्ये इन्सेंटिवायझिंग फीचर (incentivizing feature) म्हणून इन्फोटेन्मेंट सिस्टिम ऑफर केल्या जात आहेत. जर वाहन चालवताना व्हॉल्युम वाढवण्याचा आणि नवीन टेक फीचर्सचा अनुभव घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमचा अँड्रॉइड फोन (Android Phone) उपयुक्त ठरू शकतो.

  इन्फोटेन्मेंटसाठी अँड्रॉइड ऑटो (Android Auto) ही सिस्टिम उपयुक्त आहे. ही सिस्टिम वापरण्यास अतिशय सोपी आहे. तुमच्या फोन स्क्रीनवर किंवा कार डिस्प्लेवर अॅप्स आणण्यासाठी अँड्रॉइड ऑटोचा वापर करता येतो. जेणेकरून तुम्ही गाडी चालवताना फोकस करू शकता. शिवाय, याच्या मदतीनं तुम्ही ड्रायव्हिंग करताना नेव्हिगेशन (navigation), कॉल्स (Calls), टेक्स्ट मेसेज (Text Message) आणि म्युझिक (Music) यासारख्या अनेक फीचर्सवर सहज नियंत्रण ठेवू शकता, असं म्हटलं जातं, ड्रायव्हिंग करताना आपलं लक्ष टचस्क्रीन किंवा मोबाइल डिव्हाइसऐवजी रस्त्यावर ठेवणं महत्त्वाचं आहे. अँड्रॉइड ऑटो ड्रायव्हिंगपासून तुमचं लक्ष विचलित होऊ देत नाही.

  मुंबईत Google आणि CEO सुंदर पिचाईंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण

  अँड्रॉइड ऑटोचा वापर करण्यासाठी फोनमध्ये अँड्रॉइड 6.0 (Android 6.0) किंवा त्यानंतरच्या जनरेशनची ऑपरेटिंग सिस्टिम अस्तित्त्वात पाहिजे. याशिवाय अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारी गाडी (टचस्क्रीन, रोटरी नॉब किंवा टचपॅडसारखे कंट्रोल्स उपलब्ध असले पाहिजेत), आणि यूएसबी (USB) केबलचीही आवश्यक असते. जर तुमची कार वायरलेस अँड्रॉइड ऑटो क्षमतेनं (Android Auto capability) सुसज्ज असल्यास USB ची गरज लागणार नाही.

  तुमच्या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो सुरू करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात :

  स्टेप 1: तुमच्या स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड ऑटो अॅप डाउनलोड करा. जर फोनमध्ये अँड्रॉइड 10 किंवा त्यावरील व्हर्जन असेल तर अॅपची गरज भासणार नाही.

  स्टेप 2: कार पार्क असताना ती सुरू करा.

  स्टेप 3: तुमची कार अँड्रॉइड ऑटोला यूएसबी केबलद्वारे सपोर्ट करत असल्यास ती केबलद्वारे तुमच्या फोनला कनेक्ट करा. यूएसबी कनेक्टरच्या पुढे कनेक्ट केलेलं सिम्बॉल दिसतं.

  आता Tata Sky चं झालं नामांतर; नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसह प्लानमध्ये मिळणार 'या' 13 OTT सेवा

  स्टेप 4: तुमची कार वायरलेस (wireless) आणि युएसबी केबल अशा दोन्ही प्रकारे अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करत असल्यास, तुमच्या फोनवर पुढील ड्राइव्हसाठी वायरलेस पद्धतीनं कनेक्ट होण्याची सूचना मिळेल.

  स्टेप 5: जर तुम्ही तुमच्या कारला पहिल्यांदाच फोन कनेक्ट करत असाल तर कारस्क्रीनशी मॅच होणारा एक कोड मिळेल. पुढच्या वेळी मात्र, तुम्हाला ही स्टेप फॉलो करावी लागणार नाही.

  स्टेप 6: स्क्रीनवर आलेल्या सुचनांचं पालन करा. जर काही परमिशन्स मागितल्या गेल्या तर त्या मान्य करा.

  स्टेप 7: एकदा अँड्रॉइड ऑटो एनेबल्ड केल्यानंतर, ती लाँच करण्यासाठी जास्त कष्ट पडणार नाहीत. फक्त तुमच्या फोनवर 'अँड्रॉइड ऑटो ऑटोमॅटिकली' एनेबल करा. त्यानंतर आपोआप अॅप लाँच होईल. तुमची कार वायरलेस अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करत असल्यास, युएसबी केबल सेटअपची आवश्यकता नाही. त्यासाठी, ब्लूटूथ आणि वायरलेस कनेक्शन चालू असल्याची खात्री करा आणि कनेक्ट करण्यासाठी वरील स्टेप्स फॉलो करा.

  वायरलेस फीचरमध्ये एक निगेटिव्ह बाब आहे. वायरलेस फीचरमुळं आपल्या फोनची बॅटरी ड्रेन (Battery Drain) होते. वायर्ड अँड्रॉइड ऑटोमध्ये असं होत नाही. वायर्ड अँड्रॉइड ऑटोमध्ये फोन आपोआप चार्जदेखील होतो.

  तुमच्या कारमध्ये टचस्क्रीन किंवा इन्फोटेन्मेंट सिस्टिम नसली तरीही, तुम्ही स्मार्टफोन माउंट (smartphone mount) मिळवू शकता. तुमच्या स्मार्टफोनवर अँड्रॉइड ऑटो अॅप डाउनलोड करून त्याचा वापर इन्फोटेन्मेंट सिस्टम म्हणून करू शकता.

  First published:
  top videos

   Tags: Car, Tech news