जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदायी ठरतेय 'ही' जुनी उपचार पद्धत, 5 रुग्ण अगदी ठणठणीत झाले

कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदायी ठरतेय 'ही' जुनी उपचार पद्धत, 5 रुग्ण अगदी ठणठणीत झाले

कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदायी ठरतेय 'ही' जुनी उपचार पद्धत, 5 रुग्ण अगदी ठणठणीत झाले

अमेरिकेतील 5 कोरोना रुग्ण या उपचारामुळे बरे झालेत, त्यामध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 13 एप्रिल : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) सध्या नवे उपचार शोधले जात आहेत. मात्र आधीपासून अस्तित्वात असलेली उपचार पद्धतच आता आशेचा किरण ठरत आहेत. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर याच पद्धतीने उपचार करण्यात आले. 5 रुग्ण बरे झालेत, त्यामध्ये 3 भारतीयांचा समावेश आहे. Convalescent plasma ही उपचार पद्धत कोरोनापीडितांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. यामध्ये ब-या झालेल्या रुग्णांचं रक्त इतर रुग्णांना दिलं जातं, कारण या रुग्णांमध्ये व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडिज तयार झालेले असतात. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा इतर रुग्णांना देऊन त्यांच्यावर उपचार होतात. याच पद्धतीने अमेरिकेत 5 कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले आणि हे पाचही जण बरे झालेत. ह्युस्टनमधील बेलर सेंट ल्युक मेडिकल सेंटरमध्ये 5 रुग्ण भरती होते. जितेंद्र आव्हाडांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, क्वारन्टाइन झाल्यानंतर दिली माहिती बेलर सेंट ल्युक कॉलेज ऑफ मेडिसीनचे उपाध्यक्ष अशोक बालासुब्रमण्यम यांनी सांगितलं की, “आम्ही 5 जणांवर या पद्धतीने उपचार केले आणि पाचही जण आता बरे झालेत. या 5 पैकी तिघं भारतीय वंशाचे आहेत, तर दोघं अमेरिकन आहेत” “आमच्या कॉलेजला क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगीही मिळाली आहे. पुढच्या आठवड्यात ही ट्रायल सुरू करणार आहे. ब-या झालेल्या या 5 रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा घेऊन इतर रुग्णांना बरं करणार. त्यानंतर त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेणार. त्यानंतर ही प्रक्रिया अशीच पुढे नेणार”, असं बालासुब्रमण्यम यांनी सांगितलं. महाराष्ट्रात 15 ते 20 एप्रिलमध्ये कोरोनाचा मोठा धोका, निर्बंध कडक होणार? “ही उपचार पद्धत आशियाई देशात वर्षानुवर्षे अवलंबली जाते. कोरोनाव्हायरसविरोधात लस तयार होण्यासाठी जवळपास 12 ते 18 महिने लागतील. तोपर्यंत लोकांना वाचवण्यासाठी हा उत्तम असा मार्ग आहे”, असंही बालासुब्रमण्यम म्हणाले. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात