नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : व्हॉट्सॲपवर (whatsapp) एखाद्या फॅमिली ग्रुपमध्ये ॲड होणं किंवा ऑफिस ग्रुपमध्ये ॲड होणं हे कधी कधी खूपच त्रासाचं होतं. ऑफिसच्या वेळनंतरही त्या ग्रुपमध्ये मेसेजेस, फोटोज येत राहतात. या मेसेजेसमुळे सतत फोन वाजत राहतो. या मेसेजचा त्रास होऊ नये किंवा या मेसेजकडे दुर्लक्ष करता यावं म्हणूनच व्हॉट्सॲपमध्ये म्यूट बटनचा ऑप्शन देण्यात आला आहे. ज्याचा वापर करुन काही काळ या मेसेजेसकडे दुर्लक्ष करू शकत होता. पण आता ग्रुप चॅट किंवा एखादं चॅट कायमचं म्यूट करता येणार आहे. व्हॉट्सॲपच्या नवीन फीचरनुसार एखादा ग्रुप किंवा नको असलेले चॅट ‘Always mute’चा ऑप्शन वापरून कायमचं म्यूट करता येणार आहे. याआधी व्हॉट्सॲपमध्ये एखादा ग्रुप किंवा चॅट फक्त आठ तास, एक आठवडा आणि एका वर्षासाठी म्यूट करण्याचा ऑप्शन उपलब्ध होता. पण त्यानंतर पुन्हा ग्रुप अनम्यूट व्हायचा. पण आता व्हाट्सॲपच्या नवीन बदलानुसार कायमचा एखादा ग्रुप किंवा चॅट म्यूट ठेवता येणार आहे. व्हाट्सॲपने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
You can now mute a chat forever 🤫 pic.twitter.com/DlH7jAt6P8
— WhatsApp (@WhatsApp) October 23, 2020
(वाचा - 90 डिग्रीपर्यंत फिरतो या स्मार्टफोनचा डिस्प्ले; 28 ऑक्टोबरला भारतात होणार लाँच ) व्हाट्सॲपमध्ये हा बदल व्हावा अशी अनेक यूजर्सची इच्छा होती. तशी मागणीही व्हॉट्सअपला करण्यात आली होती. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअपच्या वापरकर्त्यांना प्रचंड दिलासा मिळाला असून त्यांनी आपला आनंद आपल्या पोस्टद्वारे शेअर केला आहे.
Peace is restored forever now.🙌 https://t.co/363mMi2jti
— Abhi Jain (@abhinjain30) October 23, 2020
दरम्यान, फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, आता व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲपमध्ये, ॲप परचेस आणि होस्टिंग सेवा देण्यास सुरुवात करणार आहेत. यामुळे कंपनीला महसूलवाढीसाठी मदत होणार आहे.
(वाचा - WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा;पाहा हे फीचर कसं वापराल )
फेसबुककडून 2014 मध्ये व्हॉट्सॲप 19 अब्ज डॉलर्सला विकत घेण्यात आलं होतं. परंतु इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपमधून आता हवी तेवढी कमाई होत नसल्याचं चित्र आहे. यामुळेच काही नवीन बदल व्हॉट्सॲपमध्ये करण्यात येणार आहेत. ज्यातून व्हाट्सॲप आणि फेसबुकद्वारे वस्तूंची खरेदी-विक्री सुद्धा केली जाणार आहे. मे महिन्यात फेसबूकने लाँच केलेल्या फेसबूक शॉपच्या माध्यमातून व्हॉट्सअपवरून या शॉपमधील वस्तू युजर विकत घेऊ शकेल. फेसबुकच्या सर्व अपच्या माध्यमातून या खरेदीचा आनंद लवकरच घेता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.