नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : LG कंपनी आपला खास आणि अनोखा स्मार्टफोन 28 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करणार आहे. LG Wing कंपनीच्या Explorer प्रोजेक्ट अंतर्गत हा पहिला फोन आहे. या फोनमध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत, जे 90 डिग्रीपर्यंत फिरतात. हा फोन मल्टीटास्किंगसाठी बनवण्यात आला आहे. युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी, सॉफ्टवेअरमध्येही कंपनीने अनेक बदल केले आहेत. LG Wing च्या भारतीय किंमतीबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु दक्षिण कोरियामध्ये याची सुरुवातीची किंमत KRW 1,098,900 म्हणजे जवळपास 71,400 रुपये आहे. (वाचा - बॅननंतरही हे चिनी App होतंय डाउनलोड; भारतात 10 कोटी यूजर्स ) LG Wing स्पेसिफिकेशन्स - - 6.8 इंची curved P-OLED डिस्प्ले Full HD+ - high aspect ratio 20.5:9 - मेन डिस्प्लेखाली सेकेंडरी 3.9 इंची G-OLED डिस्प्ले, aspect ratio 1.15:1 - स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर - 8 जीबी रॅम आणि 128 जीबी/ 256 जीबी स्टोरेज - 4,000 mAh बॅटरी - क्विक चार्ज 4.0+ 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट
(वाचा - जुलै ते सप्टेंबरमध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री; टॉप 5 मध्ये चार चीनी कंपन्या )
कॅमेरा - पॉप-अप सेल्फी कॅमेरावाला हा LGचा पहिला फोन आहे. 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह, रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप चौकोर मॉड्यूलमध्ये देण्यात आला आहे. सेटअपमध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स, 12 मेगापिक्सल अल्ट्रावाईड सेंसर आणि 13 मेगापिक्सल अल्ट्रालाईड कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल अल्ट्रा-वाईड अँगल लेन्समुळे LG Wing मुळे गिंबल मोशन कॅमेरा फीचर देण्यात आला आहे.
(वाचा - Apple watchच्या ‘या’ फीचरमुळे वाचले 61 वर्षीय भारतीय व्यक्तीचे प्राण )
कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये 5जी, 4जी, वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सामिल आहे. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.