जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा; जाणून घ्या हे फीचर कसं वापराल

WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा; जाणून घ्या हे फीचर कसं वापराल

WhatsApp मध्ये समस्या आल्यास आता तक्रार थेट कंपनीकडे करा; जाणून घ्या हे फीचर कसं वापराल

युजर्स व्हॉट्सऍपमध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्या किंवा बगचा रिपोर्ट थेट कंपनीकडे करू शकणार आहेत. कंपनीकडून सध्या या फीचरच्या बीटा व्हर्जनवर टेस्टिंग सुरू आहे, त्यानंतर हे अपडेट सर्व युजर्ससाठी जारी करण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : व्हॉट्सऍप मेसेजिंग ऍप अतिशय यूजर फ्रेंडली ऍप असून नेहमी युजर्सच्या सुविधेसाठी नव-नवीन फीचर्स अपडेट केले जातात. अशातच आता व्हॉट्सऍपने (WhatsApp) एक नवं इन-ऍप सपोर्ट फीचर (in-app support feature) लॉन्च केलं आहे. याच्या मदतीने युजर्स व्हॉट्सऍपमध्ये येणाऱ्या कोणत्याही समस्या किंवा बगचा रिपोर्ट थेट कंपनीकडे करू शकणार आहेत. कंपनीकडून सध्या या फीचरच्या बीटा व्हर्जनवर टेस्टिंग सुरू आहे, त्यानंतर हे अपडेट सर्व युजर्ससाठी जारी करण्यात येणार आहे. WABetaInfo वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, हे फीचर अँड्रॉईड युजर्स 2.20.201.5 आणि 2.20.202.7 बीटा वर्जनमध्ये आलं आहे. व्हॉट्सऍप या सुविधेला Contact us पेजच्या माध्यमातून उपलब्ध करत आहे. युजर्स येथे आपली तक्रार टेक्स्ट फॉर्ममध्ये टाईप करून पाठवू शकतात. युजर्सला व्हॉट्सऍपमध्ये कोणतीही समस्या आल्यास, व्हॉट्सऍप सेटिंगमध्ये Help वरून ते मदत घेऊ शकतात. Help मध्ये Contact us चा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक केल्यावर एक Text Box येईल. तेथे युजर्स आपली समस्या सांगू शकतात. त्यासोबतच फोटो अटॅच करण्याचाही ऑप्शन येईल, त्यात समस्येचा स्क्रिन शॉट अटॅच करता येईल. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मेसेज सेंड करू करता येणार आहे. WhatsApp ची सपोर्ट टीम युजर्सच्या समस्येचं निराकरण करण्यास सक्षम असेल. ही टीम WhatsApp support chat च्या माध्यमातून तक्रारदाराशी बोलू शकेल. तक्रारदाराचं काम झाल्यानंतर चॅट अपोआप बंद होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: whatsapp
  • First Published :
जाहिरात
जाहिरात