जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमचे कॉल्स सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सॲप आणणार नवं फीचर

तुमचे कॉल्स सुरक्षित करण्यासाठी व्हॉट्सॲप आणणार नवं फीचर

जर कोणी WhatsApp Group मध्ये Add केलं तर तुमचं नाव दिसणार नाही.

जर कोणी WhatsApp Group मध्ये Add केलं तर तुमचं नाव दिसणार नाही.

मेटाच्या (Meta) मालकीचं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सॲप एका नव्या फिचरवर (Feature) काम करत आहे. या नव्या फिचरमुळे हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप खरंच एंड-टू-एंट इनक्रिप्टेड आहे हे अधिक स्पष्ट होईल.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 23 डिसेंबर : सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून तुम्ही जगाच्या पाठीवर कोठेही असलेल्या व्यक्तीसोबत संवाद साधू शकता, खासगी जीवनातील गोष्टी शेअर करू शकता. सध्या वैविध्यपूर्ण फीचर्स असलेले अनेक इन्स्टंट मेसेजिंग ॲप (Instant Messaging App) उपलब्ध आहेत. परंतु, व्हॉट्सॲप (WhatsApp) हे ॲप सर्वाधिक लोकप्रिय मानलं जातं. गेल्या काही काळापासून युजर्सच्या प्रायव्हसीच्या अनुषंगानं व्हॉट्सॲपवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. यातून अनेक युजर्सनं व्हॉट्सॲपऐवजी अन्य पर्यायी ॲप्सचा वापर सुरू केला. ही बाब लक्षात येताच व्हॉट्सॲपनं तातडीनं पावलं उचलत युजर्सची प्रायव्हसी जपण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यावर भर दिला. लवकरच यातील पुढचं पाऊल व्हॉट्सॲप टाकत आहे. नव्या फिचर्सच्या माध्यमातून व्हॉट्सॲप हे खरंच एंड-टू-एंड इनक्रिप्टेड (End -To-End Encrypted) आहे, हे स्पष्ट करण्यावर कंपनीचा भर असेल. विशेष म्हणजे या नव्या फिचर्सवर कामदेखील सुरू झालं आहे. मेटाच्या (Meta) मालकीचं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सॲप एका नव्या फिचरवर (Feature) काम करत आहे. या नव्या फिचरमुळे हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप खरंच एंड-टू-एंट इनक्रिप्टेड आहे हे अधिक स्पष्ट होईल. व्हॉट्सॲपवरील कॉल्स (Calls) एंड-टू-एंड इनक्रिप्टेड असल्याची माहिती देण्यासाठी हे अ‍ॅप दोन नवे इंडिकेटर्स (Indicators) आणणार आहे. हे नवे इंडिकेटर्स लवकरच कॉलिंग स्क्रिनवर आणि आयओएसच्या (iOS) व्हॉट्सॲप व्हर्जनवरील स्टेटस स्क्रिनवर दिसणार आहेत. हेही वाचा :  किकवर चालते जीप; मराठमोळ्या व्यक्तीचा आविष्कार पाहून आनंद महिंद्राही थक्क झाले तुमचा कॉल एंड-टू-एंड इनक्रिप्टेड असल्याचं युजर्सला त्यांच्या कॉलिंग स्क्रिनवर सूचित केलं जातं. व्हॉट्सॲप ट्रॅकर WABetainfo ला हे फिचर प्रथम आढळून आले. त्याने या इंडिकेटर्सचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटनुसार, व्हॉट्सॲपवरील कॉल स्क्रिन कॉल लिस्टच्या खाली तुमचे खासगी कॉल्स एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहेत असं सूचित करताना दिसत आहे. स्टेटस स्क्रिन रिपोर्टमध्ये शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये तुमचं स्टेटस एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहे, असा इंडिकेटर देखील दाखवत आहे. या वर्षाच्या सुरवातीपासून मेटा मालकीचे हे अ‍ॅप पॉलिसी आणि वापराच्या अटींच्या अपडेटसवरुन वादात सापडले होते. तेव्हापासून व्हॉट्सॲप त्याच्या एंड-टू-एंड इन्क्रिप्शनवर भर देताना दिसत आहे. व्हॉट्सॲप कोणत्याही युजर्सच्या मेसेजमधील मजकूर वाचू शकत नाही. मेटाडेटा (तुमच्या मेसेज बद्दल माहिती) इन्क्रिप्टेड नाही. तसेच मूळ कंपनी मेटासोबत (पूर्वीची फेसबुक) शेअर केला जात नाही. व्हॉट्सॲपने 2016 मध्ये चॅटसाठी एंड-टू-एंड इन्क्रिप्शन सुरू केले. त्यासाठी व्हॉट्सॲपनं प्रतिस्पर्धी अ‍ॅप सिग्नलसारखाच (Signal) एन्क्रिप्शन प्रोटोकॉल (Encryption Protocol) वापरला. हा प्रोटोकॉल सध्याच्या काळात सुरक्षित इन्स्टंट मेसेजिंगमध्ये `गोल्ड स्टॅंण्डर्ड` मानला जातो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात