Home /News /viral /

Kick मारताच चालते Jeep; मराठमोळ्या व्यक्तीचा आविष्कार पाहून Anand Mahindra सुद्धा झाले इम्प्रेस

Kick मारताच चालते Jeep; मराठमोळ्या व्यक्तीचा आविष्कार पाहून Anand Mahindra सुद्धा झाले इम्प्रेस

आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी या व्यक्तीला किकवर (Jeep start with kick) सुरू होणाऱ्या या जीपच्या बदल्यात बोलेरो ऑफर केली आहे.

    मुंबई, 22 डिसेंबर : जीप (Jeep video) म्हटलं की आपल्यासमोर महिंद्रा येतंच. जीप म्हणजे फक्त महिंद्राची असं अनेकांना वाटतं. याच महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  यांनी एका जीपचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण ही जीप त्यांच्या कंपनीची नाही तर एका मराठमोळ्या व्यक्तीने जुगाड करून तयार केलेली जीप आहे (Jeep start on kick video). ही जीप पाहून आनंद महिंद्राही इम्प्रेस झाले आहेत. आनंद महिद्रां यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओतील जीपची खासियत म्हणजे ती किकवर स्टार्ट होते. एक किक मारताच ही जीप सुरू होते. या खास जीपकडे आनंद महिंद्रा यांचंही लक्ष केलं. या अनोख्या जीपचा व्हिडीओ ते आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी या जीपचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक जीप रस्त्यावर उभी दिसते आहे. जीपच्या आत एक महिला बसली आहे आणि जीपच्या बाहेर एक व्यक्ती उभी आहे. ही व्यक्ती त्या जीपला किक मारते आणि एका फटक्यात जीप सुरू होते. त्यानंतर प्रवाशांना घेऊन ही जीप चालतानाही दिसते. हे वाचा - इथं लोक पार्क केलेली कार करत नाही लॉक; खिडकी, दरवाजा, डिग्गी उघडी ठेवतात कारण... व्हिडीओतील संवाद तुम्ही ऐकला तर ही जुगाड जीप तयार करणाऱ्या व्यक्तीच नाव दत्तात्रय लवार असं आहे. त्याने बाईक टूव्हिलर, रिक्षा आणि जीपचं सामान वापरलं आहे. टूव्हिलरचा किक पार्ट, जीपचा पुढील पार्ट आणि रिक्षाचं टायर लावलं आहे. तसंच त्यांनी पॅसेंजर इंजिनचा वापर केला आहे. यानंतर आनंद महिंद्रा यांनी आणखी एक ट्विट केलं आहेत. ज्यात त्यांनी या व्यक्तीला बोलेरो ऑफर केली आहे. हे वाचा - 'कार अॅंड बाईक डॉट कॉम'ची 'हीरो इलेक्ट्रिक'शी भागीदारी, ग्राहकांना मिळणार हे लाभ पोस्टमध्ये ते म्हणाले, "स्थानिक प्रशासन कदाचित नियमात बसत नसल्याने ही गाडी रस्त्यावर चालवू देणार नाही. त्यामुळे या गाडीच्या बदल्यात मी स्वतः या व्यक्तीला बोलेरो ऑफर करतो. त्याचा हा आविष्कार महिंद्रा रिसर्च व्हॅलीत प्रदर्शनासाठी ठेवला जाईल. जेणेकरून कमीत कमी संसाधनात चांगलं काही तरी बवण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Anand mahindra, Vehicles, Viral, Viral videos

    पुढील बातम्या