मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp वापरण्यासाठी पुढील महिन्यापासून लागू शकतो नवा स्मार्टफोन, वाचा काय आहे कारण

WhatsApp वापरण्यासाठी पुढील महिन्यापासून लागू शकतो नवा स्मार्टफोन, वाचा काय आहे कारण

व्हॉट्सअ‍ॅप नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून जुन्या Android आणि iOS डिव्हाइसवर काम करणार नाही. यामधील नवीन आणि अद्ययावत सुरक्षा फीचर्स जुने (WhatsApp  Update News) स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांना आपोआप लॉग आउट करतील.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर: तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp  New Version) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लवकरच जुन्या मोबाइल हँडसेटमधून व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक महत्त्वाचे अपडेट केले जाणार आहे ज्यानंतर काही डिव्हाइसमध्ये (WhatsApp will stop working in old Devise) व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. व्हॉट्सअ‍ॅप नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून जुन्या Android आणि iOS डिव्हाइसवर काम करणार नाही. यामधील नवीन आणि अद्ययावत सुरक्षा फीचर्स जुने (WhatsApp  Update News) स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांना आपोआप लॉग आउट करतील.

व्हॉट्सअ‍ॅपचा मालकी हक्क फेसबुक या सोशल मीडिया कंपनीकडे आहे. या अपडेट बाबत माहिती देताना कंपनीने हा निर्णय घेण्यामागचे कारण सांगितले आहे. कंपनीच्या मते, गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील महिन्यापासून, हे अ‍ॅप Android आणि iOS च्या जुन्या व्हर्जनमध्ये सपोर्ट करणार नाही. फक्त Android OS 4.1 आणि iOS 10 आणि त्यापेक्षा वरच्या पातळीवरील स्मार्टफोन वापरणारे युजर्स  WhatsApp वापरू शकतील.

वाचा-Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'

याशिवाय, Jio फोन आणि Jio Phone 2 सह KaiOS 2.5.0 किंवा त्यापेक्षा अधिकच्या श्रेणीतील फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालेल. अ‍ॅपला सपोर्ट न करणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये KaiOS 2.5.0 3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 यांचा समावेश होतो.

युजर्सना फोनच्या ओएस स्टेटस सेटिंग मेनूमध्ये बघून हे माहित करून घेता येईल की, पुढील महिन्यापासून ते त्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकतील की नाही.  जर तुमचा फोन वरीलपैकी अपडेटेड व्हर्जनपैकी नसेल तर नवीन फोन खरेदी करावा लागेल.

वाचा-फ्रीमध्ये Youtube Music वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, तुमच्यावर असा होणार परिणाम

दरम्यान सुरक्षेबाबत अनेक देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपला इशारा देण्यात आला आहे. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने सुरक्षा फीचर मजबूत करण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला केंद्र सरकारने इशाराही दिला होता. चीनसारख्या काही देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

First published:

Tags: Whatsapp