WhatsAppच्या 'या' कृतीला युजर्स वैतागले; अ‍ॅपवर होत आहेत आपोआप Banned

WhatsAppच्या 'या' कृतीला युजर्स वैतागले; अ‍ॅपवर होत आहेत आपोआप Banned

लोकप्रिय फोरम वेबसाईट रेडइटवर एका युझरने आपली समस्या शेअर करताना लिहीले आहे की मला अचानक अकाऊंटवरुन बॅन (Ban) करण्यात आले.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल: व्हॉटसॲप (WhatsApp) हे मेसेजिंग ॲप अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र गेल्या काही काळापासून हे ॲप प्रायव्हसी पॉलिसीसारख्या काही गोष्टींमुळे जोरदार चर्चेत आहे. खरंतर याचा या ॲपला काही प्रमाणात फटका देखील बसला आहे. कारण अनेक युझर्सने व्हॉटसॲपला रामराम करीत दुसरे ॲप्स वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु, हे सर्व जरी असले तरी व्हॉटसॲपची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स सध्या व्हॉटसॲप विषयी तक्रारीचा सूर आळवता दिसत आहेत. मेसेज वाचताना किंवा ॲपचा वापर करताना अचानक व्हॉटसॲपमधून लॉगआऊट (Logout) होत असल्याचं अनेक युजर्सनं म्हटलं आहे. तर काही युझर्सनं मला ॲपवर बॅन करण्यात आल्याचं सांगितलं आहे. युझर्सनं व्हॉटसॲपच्या पॉलिसीचा (Policy) भंग केल्यामुळे हे घडत असावं,असे मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे. जर तुम्हाला अशी अडचण जाणवत असेल तर तुम्ही कंपनीशी मेलवरुन संपर्क करावा.

लोकप्रिय फोरम वेबसाईट रेडइटवर एका युझरने आपली समस्या शेअर करताना लिहीले आहे की मला अचानक अकाऊंटवरुन बॅन (Ban) करण्यात आले. याबाबत त्याने फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटसॲप कंपनीला अनेकदा ई-मेल (E-mail) केले. परंतु, मला त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. मी व्हॉटसॲपच्या पॉलिसीविरोधात कोणतेही कृत्य केलेले नाही. मात्र माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील एक व्यक्ती हॅकिंगसारख्या गोष्टींमध्ये सामील होता. त्यामुळे माझे अकाऊंट सस्पेंड केल्याचे त्याने सांगितले. खरेतर सायबर अटॅकच्या (Cyber Attack) वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर असे करण्यात आले. 12 तासांच्या बॅननंतर टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या (Two Step Verification) माध्यमातून मोबइलवर ओटीपी आला आणि त्या युझर्सला पुन्हा लॉगिन करणे शक्य झाले.

वाचा: जिद्दीला शिक्षणाची जोड! MBA असणाऱ्या सरपंचाने केला गावाचा कायापालट, PM मोदीही झाले फॅन

संदिग्ध घडामोडींमुळे केली जाऊ शकते बंदी

व्हॉटसॲप आपल्या पॉलिसी नुसार संदिग्ध घडामोडींच्या अनुषंगाने तुमचे अकाऊंट बॅन किंवा बंद करु शकते. या घडामोडींमध्ये बल्क मेसेजेस (Bulk Messages) पाठवणे, ऑटोमेटेड मेसेज सेटिंग करुन मेसेजेस पाठवणे अशा कृती केल्यास तुमचे अकाऊंट व्हॉटसॲप बॅन करु शकतो. सातत्यानं मेसेज पाठवण्याला व्हॉटसॲप संदिग्ध घडामोड किंवा कृती मानते. यासाठी व्हॉटसॲपने युजर्सकरिता एक मर्यादा राखून ठेवली आहे.

मात्र युजर्सला चिंता करण्याचं कारण नाही. कारण ही मर्यादा युजर्स कधीच ओलांडू शकत नाही. व्हॉटसॲप युजर्सला कल्पना न देता त्याला बॅन करीत नाही. जर कधी चुकून तुमचे अकाऊंट बंद झाले तर तुम्ही तातडीने तुमच्या कडील व्हॉटसॲप सपोर्ट मेलव्दारे (Support Mail) ही बाब सांगू शकता.

First published: April 17, 2021, 8:12 PM IST

ताज्या बातम्या