Home /News /technology /

मोबाइलवरूनच खरेदी करता येणार इन्शुरन्स पॉलिसी, WhatApp Pay ने सुरू केली पेमेंट सुविधा

मोबाइलवरूनच खरेदी करता येणार इन्शुरन्स पॉलिसी, WhatApp Pay ने सुरू केली पेमेंट सुविधा

ता ऑनलाइन पैसे पाठवण्यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीही खरेदी करता येईल, अशी माहिती फेसबुक फ्युएल फॉर इंडिया 2020 (Facebook Fuel For India 2020) या अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात कंपनीने जाहीर केली.

  नवी दिल्ली, 17 डिसेंबर : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय माध्यमाने भारतात आता डिजिटल पेमेंट सर्व्हिसही (Digital Payment Service) सुरू केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय (ICICI) आणि अ‍ॅक्सिस (Axis) या बँकांशी करार केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या अनुक्रमे सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्जं देणाऱ्या सर्वांत मोठ्या बँका आहेत. या चारही बँकांचे कोट्यवधी ग्राहक आता व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन मनी ट्रान्स्फर (Online Money Transfer) करू शकतात. फेसबुकच्या (Facebook) मालकीचं असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे माध्यम इन्स्टंट मेसेजिंग, कॉल, व्हिडीओ कॉल आदींसाठी लोकप्रिय आहे. आता ऑनलाइन पैसे पाठवण्यासोबतच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीही खरेदी करता येईल, अशी माहिती फेसबुक फ्युएल फॉर इंडिया 2020 (Facebook Fuel For India 2020) या अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात कंपनीने जाहीर केली. व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं, की सॅशे साइज्ड इन्शुरन्स पॉलिसी (Sachet Sized Insurance Policy) खरेदी करता येण्यासाठी एसबीआय किंवा एचडीएफसी बँकेसोबत व्हॉट्सअ‍ॅप काम करू शकतं. सॅशे साइज्ड इन्शुरन्स पॉलिसी विशेष गरजेसाठी खरेदी केली जाते. या पॉलिसीचा प्रीमिअम (Premium) कमी असतो.

  (वाचा - WhatsApp Web वापरताय? आता यामध्येही करता येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग)

  व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक एचडीएफसी पेन्शन्स (Pensions), तसंच पिनबॉक्स सोल्युशन्सदेखील खरेदी करू शकतात. त्यामुळे त्या ग्राहकांना रिटायरमेंटकरिता (Retirement) बचत करण्यासाठी मदत मिळेल. ज्यांच्याकडे रिटायरमेंट प्लॅन्स नाहीत किंवा ज्यांना त्यांच्या कंपनीकडून अशा प्रकारचे शिस्तबद्ध लाभ मिळत नाहीत, त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सर्व्हिस 16 डिसेंबर 2020 रोजी भारतीय ग्राहकांसाठी सुरू झाली आहे. देशातले दोन कोटी व्हॉट्सअ‍ॅप युझर्स या सेवेचा लाभ घेऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी सांगितलं, की एसबीआयचा किफायतशीर आरोग्य विमा (Health Insurance) व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून खरेदी करणं डिसेंबर अखेरपर्यंत शक्य होऊ शकेल. या पेमेंट सर्व्हिससाठी कंपनीला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) नोव्हेंबर 2020 मध्येच परवानगी मिळाली असून, पेमेंट फीचर यूपीआय (UPI) सिस्टमवर विकसित करण्यात आलं आहे.

  (वाचा - PUBG Mobile येणार का? लाँचबाबत सरकारचा मोठा खुलासा)

  व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हेट कशी कराल? - व्हॉट्सअ‍ॅपच्या होम पेजवर उजव्या बाजूला वर तीन डॉट्स असतात. त्यांवर क्लिक केल्यावर Payment हा ऑप्शन दिसेल. - पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यावर पेमेंट विंडो ओपन होईल. त्यामध्ये Add new payment method या पर्यायावर क्लिक करावं. - Accept केल्यावर चारही पार्टनर बँकांची नावं येतील. त्यातल्या आपल्या बँकेच्या नावावर क्लिक करावं. - त्यानंतर बँकेत दिलेला आपला फोन नंबर टाकून व्हेरिफाय करावं. - आपला मोबाइल नंबर टाकल्यावर व्हॉट्सअ‍ॅपकडून बँक अकाउंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. - व्हेरिफिकेशन झाल्यावर तुम्ही पैसे ट्रान्स्फर करू शकता.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Whatsapp, Whatsapp pay

  पुढील बातम्या