Home /News /technology /

WhatsApp Web वापरताय? आता यामध्येही करता येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग

WhatsApp Web वापरताय? आता यामध्येही करता येणार ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंग

WhatsApp beta टेस्टर्सला WhatsApp Web मध्ये कॉलिंग फीचर देण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनी याचं अपडेट सर्व युजर्ससाठी जारी करू शकते. रिपोर्टनुसार, WhatsApp काही युजर्ससाठी बीटा टेस्टिंग म्हणून WhatsApp Web मध्ये कॉलिंग फीचर देत आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 17 डिसेंबर : व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये (WhatsApp Web) कंपनी हळूहळू मोबाईल वर्जनचे WhatsApp फीचर्स देत आहे. आता WhatsApp Web मध्ये ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल फीचर देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीही व्हॉट्सअ‍ॅप वेबमध्ये ऑडिओ-व्हिडीओ फीचर्सचे अनेक रिपोर्ट आले होते. मात्र आता यावर काम करण्यास सुरुवात झाली आहे. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp beta टेस्टर्सला WhatsApp Web मध्ये कॉलिंग फीचर देण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनी याचं अपडेट सर्व युजर्ससाठी जारी करू शकते. रिपोर्टनुसार, WhatsApp काही युजर्ससाठी बीटा टेस्टिंग म्हणून WhatsApp Web मध्ये कॉलिंग फीचर देत आहे.

  (वाचा - PUBG Mobile येणार का? लाँचबाबत सरकारचा मोठा खुलासा)

  WhatsApp च्या मोबाईल वर्जनप्रमाणे WhatsApp Web च्या चॅट हेडरमध्ये Voice आणि Video कॉलचा ऑप्शन आहे. कॉल आल्यावर WhatsApp Web मध्ये एक नवीन विंडो पॉप-अप होईल, तेथून युजर्स कॉलला अ‍ॅक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकतील. WhatsApp Web वरुन कॉल करण्यासाठीही एक पॉप अप मिळेल, जिथे कॉलिंगचे ऑप्शन्स दिले जातील. इतर व्हिडीओ कॉलिंगप्रमाणे प्लॅटफॉर्मप्रमाणेच युजर्सला व्हिडीओ ऑफ, व्हॉईस म्यूट आणि रिजेक्ट करण्याचा ऑप्शन मिळेल.

  (वाचा - Instagram ऑर्डर करताना सावधान! चॅटद्वारे तरूणीला 7 लाखांचा गंडा)

  WhatsApp Web वर कॉलिंगवेळीच युजर्स मेन व्हॉट्सअ‍ॅप इंटरफेसवर चॅटिंगही करू शकतात. कारण कॉलिंगसाठी एक वेगळी पॉप-अप विंडो ओपन होईल. परंतु WhatsApp Web चं हे नवं फीचर कंपनीने सर्व युजर्ससाठी नेमकं कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Whatsapp, WhatsApp features

  पुढील बातम्या