Home /News /technology /

Apple iphone चा पासवर्ड विसरलात? चिंता करू नका; असा करा फोन अनलॉक

Apple iphone चा पासवर्ड विसरलात? चिंता करू नका; असा करा फोन अनलॉक

आयफोन नक्की कसा अनलॉक करावा याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    मुंबई, 26 जुलै: अनेकदा आपण स्मार्टफोन (Smartphone) वापरताना कोणीही आपल्या फोनमधील फोटो, व्हिडीओ किंवा इत्तर माहिती बघू नये यासाठी खूप कठीण पासवर्ड (Strong paasword) ठेवतो. कधीकधी हा पासवर्ड आप्ल्यालाही आठवत नाही. एखाद्या जुन्या फोनचा पासवर्ड आपल्या आठवत नाही मग तो फोन अनलॉक (How to unlock phone) करायला आपल्याला त्रास होतो. मात्र iphone (Apple iphone) चं तसं नाही. तुम्ही जर आयफोनचा पासवर्ड विसरलात (Forgot Password) तर तुम्हाला फोन लगेच अनलॉक करता येतो. आयफोन नक्की कसा अनलॉक करावा याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पद्धतीनं अनलॉक करा फोन आपल्या मॅकमध्ये किंवा विंडोज कम्प्युटरमध्ये iTune डाउनलोड करा. आपल्या आयफोनला फोर्स restart करा. यासाठी आवाजाच्या बटनेला आणि पॉवर बॅटनेला सोबत दाबा आणि लगेच सोडून द्या. यानंतर तुमच्यासमोर restore किंवा update हे पर्याय दिसतील. यापैकी रिस्टोर या पर्यायाला निवडा. यानंतर  iTune तुमच्या फोनमध्ये एक सॉफ्टवेअर डाउनलोड करेल.ज्याला थोडा वेळ लागू शकतो. हे वाचा - महिला पोलिसाचं Gmail हॅक करुन न्यूड फोटो व्हायरल, कसं सुरक्षित ठेवाल अकाउंट? यानंतर आयफोन Recovery Mode बाहेर येईल. असं न झाल्यास वरील संपूर्ण प्रक्रिया पुन्हा एकदा करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा आयफोन अनलॉक होईल. यानंतर तुम्ही तुमच्या आयफोन साठी नवीन पासवर्ड तयार करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Iphone, Technology

    पुढील बातम्या