• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Right to Love चा कुटुंबाकडून विरोध; लग्नाच्या 2 महिन्यात 12 वीच्या विद्यार्थिनीचं धक्कादायक पाऊल

Right to Love चा कुटुंबाकडून विरोध; लग्नाच्या 2 महिन्यात 12 वीच्या विद्यार्थिनीचं धक्कादायक पाऊल

विवाहित तरुणासोबत या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं होतं, अखेर...

 • Share this:
  भोपाळ, 17 जुलै : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सीमेवरील बैतूल या गावात 18 वर्षांच्या 12 वीत शिकणाऱ्या तरुणीचं तिच्या मनाविरुद्द लग्न लावणं पतीला महागात पडलं आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात FIR दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. देशात अनेक गावांमध्ये आजही तरुणींचं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं जातं. अनेकदा घरातल्यांच्या इच्छेचा मान ठेवून मुली सर्व अत्याचार सहन करीत असतात. मात्र बैतूल गावातील या तरुणीने मात्र याचा पुरेपूर सूड उगवला आहे. या 18 वर्षांच्या तरुणीने पतीवर बलात्काराचं गुन्हा दाखल केला आहे. तिने सांगितलं की, गावात राहणाऱ्या प्रियकरासोबत ती 27 डिसेंबर 2020 मध्ये घर सोडून निघून गेली होती. बैतूल पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर तिला नातेवाईकांच्या घरी पाठविण्यात आलं. तेथे ती 2 महिने राहिली. येथेच विद्यार्थिनीच्या मनाविरुद्ध लग्न लावून देण्यात आलं होतं. 27 एप्रिल रोजी तिचं लग्न लावून देण्यात आलं. पतीची इंदूरमध्ये नोकरी असल्या कारणाने ती तेथे राहू लागली. मात्र ती पतीसोबत फार दिवस राहू शकली नाही. ती तिथून निघून गेली. बैतूल पोहोचल्यानंतर तिने पतीवर बलात्काराचा आरोप लावला. (The girl filed a rape case against her husband) तिने पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. दोन महिन्यांपर्यंत पती तिच्यासोबत जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवत होता. यानंतर पोलिसांनी पतीविरोधात झिरो वर केस दाखल केला. सांगितलं जात आहे की, ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न लावून देण्यात आलं तो आधीच विवाहित आहे. हे ही वाचा-बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची शेतकरी महिलेकडून हत्या; कोर्ट म्हणालं... प्रियकरही गेला होता तुरुंगात प्रेमप्रकरणामुळे तरुणीला घराबाहेर जाण्यासही बंदी घालण्यात आली होती. यामुळे ती प्रियकरासोबत घर सोडून निघून गेली. पोलिसांनी तिला पकडल्यानंतर तिने प्रियकराविरोधातही गुन्हा दाखल केला. यावेळी तिने सांगितलं की, तरुण तिला फसवून घेऊन गेला. आणि तिच्यासोबत अनेकदा बलात्कार केला. पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेऊन कोर्टात दाखल केलं, येथे त्याला तुरुंगात पाठविण्यात आलं होते. दुसरीकडे भोपाळमध्ये राहणाऱ्या अनिल नावाच्या तरुणासोबत विद्यार्थिनीचं लग्न लावून देण्यात आलं. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर प्रियकर पुन्हा विद्यार्थिनीच्या संपर्कात आला होता.
  Published by:Meenal Gangurde
  First published: