मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुम्हालाही आहे पैशांची आवश्यकता? याठिकाणी मिनिटांमध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचं कर्ज; वाचा सविस्तर

तुम्हालाही आहे पैशांची आवश्यकता? याठिकाणी मिनिटांमध्ये मिळेल 10 लाखांपर्यंतचं कर्ज; वाचा सविस्तर

जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही काही मिनिटांमध्ये 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवू शकता.

जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही काही मिनिटांमध्ये 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवू शकता.

जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही काही मिनिटांमध्ये 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवू शकता.

नवी दिल्ली, 17 जुलै: पैशांची आवश्यकता असल्यास कर्जाचा पर्याय अनेकांकडून स्विकारला जातो. मात्र अनेकदा कर्ज मिळवण्यासाटी कोणत्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा असा प्रश्न ग्राहकांना पडतो. शिवाय लगेच कर्ज मिळेल की नाही असा प्रश्न असतोच. दरम्यान तुम्हालाही अशाप्रकारे पैशांची आवश्यकता असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.  तुम्ही काही मिनिटांमध्ये 1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवू शकता आणि ते ही अगदी सोप्या पद्धतींनी. हे कर्ज तुम्हाला मिळेल उज्जीवन स्मॉल फायनान्स (Ujjivan Small Finance Bank) बँकेमध्ये. बँकेने अलीकडेच घोषणा केली होती की ते त्यांच्या ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज (Personal Loan) सोप्या मासिक हप्त्यांमध्ये काही मिनिटांत उपलब्ध करून देईल.

कशाप्रकारे मिळेल हे कर्ज?

बँकेने ग्राहकांना ही सुविधा देण्यासाठी डिजिटल कर्जदाता आणि फिनटेक प्लॅटफॉर्म असणाऱ्या लोनटॅपशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. हे पाऊल उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या एपीआय (अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस API) या बँकिंग उपक्रमाचा हिस्सा आहे. या उपक्रमाअंतर्गत 150 हून अधिक एपीआय उपलब्ध करण्यात येणार आहेत. ग्राहकांना लोनटॅप प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विस्तारीत स्वरुपात आणि वेगाने आर्थिक सेवा पुरवणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.

हे वाचा-या वर्गाचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल,नवा प्लॅटफॉर्म लाँच

10 लाख रुपयापर्यंत मिळेल कर्ज

ग्राहकांना काही मिनिटांत सहजतेने क्रेडिट मिळू शकेल. लोनटॅपने आतापर्यंत सुमारे 32,000 ग्राहकांना त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सेवा दिली आहे. लोनटॅपच्या प्लॅटफॉर्मवर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 1 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतची वैयक्तिक कर्ज देते. यासाठी कमाल कालावधीत 48 महिन्यांचा आहे.

First published:
top videos

    Tags: Home Loan, Instant loans, Loan, Money, Pay the loan