Home /News /technology /

अरेच्चा! असंही करता येतं का? WhatsApp च्या उपयुक्त अशा 5 टिप्स अँड ट्रिक्स

अरेच्चा! असंही करता येतं का? WhatsApp च्या उपयुक्त अशा 5 टिप्स अँड ट्रिक्स

WhatsApp च्या या सहजसोप्या अशा 5 टिप्स अँड ट्रिक तुम्हाला दररोज उपयोगी ठरतील.

    मुंबई, 22 सप्टेंबर : WhatsApp तुम्हा आम्हा सर्वांचं एक संवादाचं माध्यम झालं आहे. व्हॉट्स अ‍ॅप वापरत नाही अशा व्यक्ती क्वचितच असतील. भारतात WhatsApp चे 2 अब्जांपेक्षा अधिक युझर्स आहेत. त्यातील 40 कोटी युझर्स हे दर महिन्याला WhatsApp वर अ‍ॅक्टिव्ह असतात. WhatsApp चा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतानादेखील काही सोप्या ट्रिक्स अनेकांना माहित नसतात. अशा काही ट्रिक्स ज्या तुम्हाला रोजच्या WhatsApp वापरात अत्यंत उपयोगी ठरतील, अशा पाच ट्रिक्सची आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. नंबर सेव्ह न करता मेसेज पाठवणं नंबर सेव्ह न करता मेसेज पाठवणं WhatsApp वर थोडं कठीण जातं. अशावेळी ही ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरेल. फोनमधील ब्राऊजर आणि अ‍ॅड्रेसवर गेल्यानंतर त्या ठिकाणी wa.me/91 आणि त्यानंतर ज्याला मेसेज पाठवयाचा आहेत, त्याचा मोबाईल नंबर टाईप करा. टाईप केलेल्या नंबरसोबत चॅट सुरू करण्यासाठी एक बॉक्स येईल त्यावर टॅप करा. आता या बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही चॅट तरू शकता. अशा पद्धतीने कोणताही नंबर सेव्ह न करता तुम्ही WhatsApp मेसेज पाठवू शकता. Read recipt hide न करता मेसेज वाचणं आणि मेसेज पाठवणाऱ्या मेसेज वाचला हे न समजणं अनेक वेळा WhatsApp वरील मेसेज वाचण्यासाठी आपली धडपड सुरू असते. मात्र त्याचवेळी आपण मेसेज वाचला आहे, हे संबंधित मेसेज  पाठवणाऱ्याला कळायला नको, असंही वाटतं. यासाठी WhatsApp वर read recipt hide चं ऑप्शन आहे. जे सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्ही मेसेज वाचले आहेत हे समजत नाही. म्हणजेच ज्याने तो मेसेज पाठवला आहे, त्याला ब्ल्यू मार्क दिसत नाही. हे वाचा - नव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं मात्र read recipt hide न करतादेखील तुम्ही असं करू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाण्याची गरज नाही. पण फोन लॉक असायला हवा. म्हणजे जेव्हा लॉक फोनवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचं नोटिफिकेशन येईल, तेव्हा फोन लॉक असतानाच तो मेसेज हळूवारपणे खालच्या दिशेने ओढा. असं केल्यानंतर पूर्ण मेसेज तुम्हाला दिसेल मात्र, तुम्ही तो वाचला आहे हे समोरच्याला कळणार नाही. म्हणजे सेंडरला ब्ल्यू मार्क जाणार नाही. GIF बनवणं आपल्या स्मार्टफोनमधील गॅलरीत असलेल्या छोट्या छोट्या आठवणींना GIF चे रूप देऊन ते तुम्ही आपल्या मित्रांना पाठवू शकतात. यासाठी ज्या व्यक्तीला किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तुम्हाला GIF पाठवायचं आहे, तो नंबर सिलेक्ट करा. WhatsApp चॅट विंडो ओपन करा. त्यानंतर चॅट बॉक्समधील अटॅचमेंट आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मोबाइल फोनच्या गॅलरीतून तो व्हिडीओ सिलेक्ट करा., ज्याचं तुम्हाला जीआयएफ पाठवायचं आहे. हे वाचा - पासवर्ड ठेवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा हॅक होऊ शकतं अकाऊंट WhatsApp तुम्हाला हा व्हिडिओ छोटा करण्याचं ऑप्शन देतं. हा पर्याय वापरून तुम्ही व्हिडीओ छोटा करून त्याची क्लिप तयार करू शकता. यानंतर तुम्हाला आणखी दोन पर्याय मिळतील.त्यातील GIF या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर व्हिडिओची GIF फाईल तयार होते आणि तुम्ही ती संबंधित व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवू शकता. गुपचूप व्हॉइस मेसेज ऐकणं अनेक वेळा WhatsApp वर व्हॉइस मेसेज येत असतात़. व्हॉइस मेसेजवर क्लिक करताच ते लाऊडस्पीकरमधून ऐकायला येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असा व्हॉइस मेसेज ऐकताना सर्वांपर्यंत हा आवाज पोहोचू शकतो. त्यामुळे गर्दीत  व्हॉइस मेसेज ऐकण्यासाठी आपण नेहमी फोनवर बोलताना जसा फोन कानाजवळ पकडतो, अगदी तसाच तो पकडा आणि व्हॉइस मेसेज ऐका. दरम्यान  यासंदर्भातील नवीन फिचर्सवर WhatsApp काम करत आहे़ WhatsApp ग्रुपवरील इतर सदस्य सतत करत असलेले बदल कसे रोखाल? WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही एकाच वेळी अनेकांच्या संपर्कात राहता. एकत्र चर्चा करण्यासाठी WhatsApp ग्रुप सोयीस्कर ठरतो. मात्र अनेक वेळा ग्रुपमधील इतर सदस्य ग्रुपचं नाव बदलणं, आयकॉन बदलणं  असे काही ना काही बदल करत असता. जे तुम्हाला त्रासदायक वाटू शकतं. यासाठी ग्रुप सेंटिंमध्ये ग्रुप इन्फोमध्ये जाऊन असे बदल करा, ज्यामुळे काही बदलांवर ग्रुप अ‍ॅडमिन्सचंच नियंत्रण राहू शकेल, ग्रुप अ‍ॅडमिन्सच ते बदल करतील.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Technology, Whatsapp, WhatsApp user

    पुढील बातम्या