बऱ्याचदा पासवर्ड ठेवताना आपण वाढदिवस अथवा आपलं नाव किंवा घरातील लोकांची नावं ठेवतो. पासवर्ड लक्षात राहावा म्हणून सोपा ठेवतो पण याचा फटका आपल्याला बसू शकतो. आपली प्रत्येक गोष्ट सिक्युअर राहावी म्हणून पासवर्ड ठेवणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच तो कसा ठेवतो हे पण महत्त्वाचं आहे.
सगळीकडे एकच पासवर्ड न ठेवता वेगवेगळा ठेवायला हवा. एकचा पासर्वडमुळे हॅकर्सपर्यंत सगळे अकाऊंटस पोहोचू शकतात. याशिवाय नाव आणि अडनाव किंवा मोबाईलनंबर पासवर्ड ठेवू नये हे पासवर्ड खूप सोपे आहेत त्यामुळे सहज आपलं अकाऊंट हॅक होऊ शकतं.
अंक, अक्षरं आणि स्पेशल कॅरेक्टर याचं एकत्रिकरण करून कायम पासवर्ड ठेवा. पासवर्ड जेवढा सोपा आणि सरळ तेव्हा लिक होण्याचा धोका जास्त असू शकतो हे विसरू नका. सर्वात महत्त्वाचे आपले पासवर्ड कुणालाही सांगू नका आणि शेअर करू नका.