नव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं

नव्या रूपात गुगल प्ले स्टोरवर पुन्हा आलं Paytm; पाहा आता काय बदललं

गुगल प्ले स्टोरवरून काढून टाकल्यानंतर काही तासांतच Paytm पुन्हा स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 सप्टेंबर : Paytm युझर्ससाठी खूशखबर. हे  मोबाइल पेमेंट अ‍ॅप पुन्हा गुगल प्ले स्टोरवर (google play store) आलं आहे. पेटीएमने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. प्ले स्टोरवर पुन्हा येताना पेटीएमने आपलं रूप बदललं आहे. नव्या रूपात हे अ‍ॅप आलं आहे. त्यामध्ये काही बदल कंपनीने केले आहेत. नवे बदल करून पेटीएम अ‍ॅप पुन्हा प्ले स्टोरवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम (Paytm) आणि पेटीएम फर्स्ट गेम (Paytm First Game) हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले होते. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे हे अ‍ॅप डाऊनलोड होत नव्हते. जुगारासंबंधित नियमांचे उल्लंघन होत असल्याने गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप काढून टाकले होते, असं पेटीएमने सांगितलं. आता आवश्यक त्या बदलांसह हे अॅप प्ले स्टोरमध्ये दाखल झाले आहेत.

आम्ही ऑनलाइन जुगाराला परवानगी देत नाही किंवा अशा अ‍ॅप्सना समर्थन देत नाही, असं गुगलनेही याआधी सांगितलं होतं. त्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप काढून टाकले होते. यानंतर पेटीएम आणि गुगल या दोन्ही कंपन्यांनी चर्चा करून या समस्येवर मार्ग काढला आहे.

हे वाचा - SBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर

"आम्ही नुकतंच आमच्या ग्राहकांसाठी Paytm Cricket League लाँच केलं होतं. जे क्रिकेटबाबत ग्राहकांचा असलेला उत्साह पाहता त्यांना कॅशबॅक जिंकण्यासाठी देण्यात होतं. पेटीएमएवर हे नियमांनुसारच आहे. मात्र तरी आपण कॅशबॅक कंपोनंट तात्पुरत्या स्वरूपात हटवलं आहे, जेणेकरून गुगलच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही", अशी माहिती पेटीएमने आपल्या ब्लॉगवर दिली.

हे वाचा - सावधान! देशामध्ये डिजिटल हेरगिरी वाढतेय, जाणून घ्या काय घ्याल खबरदारी

पेटीएम हे देशातील आघाडीचं पेमेंट अॅप आहे. कंपनीच्या दाव्यानुसार पेटीएमचे 50 मिलियन अॅक्टिव्ह युजर्स आहेत. त्यामुळे हे अॅप जेव्हा गुगल प्ले स्टोरवररून हटवण्यात आलं, तेव्हा मोबाइलमध्ये आधीपासून डाऊनलोड असलेलं अॅप वापरता येणार की नाही, युझर्सच्या पैशांचं काय असा सवालही उपस्थित करण्यात आला. यानंतर कंपनीने सर्वांचे पैसे सुरक्षित असल्याचं ट्वीट करत सांगितलं. तसंच लवकर आम्ही गुगल प्ले स्टोरवर परत येऊ असं आश्वासन दिलं आणि काही तासांच पेटीएम गुगल प्ले स्टोरवर आलं.

Published by: Priya Lad
First published: September 18, 2020, 8:34 PM IST

ताज्या बातम्या