मुंबई, 30 डिसेंबर : विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये (Social Media Platforms) व्हॉट्सअॅप (Whatsapp) हा सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रायव्हसीसह काही कारणांमुळे व्हॉट्सअॅप सातत्याने चर्चेत आहे. अर्थात यामध्ये नावीन्यपूर्ण फीचर्सचाही समावेश आहे. व्हॉट्सअॅप नेहमीच युझर फ्रेंडली फीचर्स (Features) लॉंच करत असतं. परंतु, या अनुषंगाने अनेकदा अफवादेखील पसरवल्या जातात. सध्या व्हॉट्सअॅपबाबत अशीच एक अफवा जोरदार चर्चेत आहे. व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट (Screenshot) शोधण्यासाठी तिसरी ब्लू टिक (Blue Tick) दिली जाणार असून, तुम्ही त्याबाबत कन्फर्म करावं, अशी ही अफवा (Fake News) आहे. ही माहिती खोटी असल्याचं एका व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकरनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे ही बाब खरी आहे की खोटी हे न तपासता काही युझर्स याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. याबाबतची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने प्रसिद्ध केली आहे.
व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट शोधण्यासाठी तिसरी ब्लू टिक देणार असून, तुम्ही त्याबाबत कन्फर्म करावं, अशा स्वरूपाची माहिती गेल्या काही दिवसांत तुमच्यापर्यंत आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावं. कारण व्हॉट्सअॅपनं असं कोणत्याही प्रकारचं फीचर लॉंच केलेलं नाही. युझर्सच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेतला गेला असेल तर ती बाब नोटिफाय करण्यासाठी व्हॉट्सअॅप ने कोणतीही नवी ब्लू टिक लॉंच केलेली नाही. तसंच स्क्रीनशॉट डिटेक्शन फीचर रोलआउट करण्याचा व्हॉट्सअॅप चा विचार नाही.
हेही वाचा : Kedarnath यात्रेदरम्यान ताटातूट, त्याने हजारो गावं पिंजून काढली, अखेर पत्नीचा शोध
अशा प्रकारची माहिती किंवा वृत्त कोणत्याही माध्यमातून समजतं तेव्हा याबाबत संबंधित प्लॅटफॉर्मचं अधिकृत ट्विटर हॅंडलवरून याची खातरजमा करणं आवश्यक आहे. व्हॉट्सअॅप कोणत्याही नव्या फीचरची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून करत असते. त्यानंतर फीचर जारी होताच युझर्सना त्याबाबतची माहिती दिली जाते. सध्या व्हॉट्सअॅप युझर्सना त्यांचा मेसेज डिलिव्हर झाल्यावर नोटिफाय (Notify) करण्यासाठी केवळ दोन टिक दर्शवते. जेव्हा या दोन टिक ब्लू होतात तेव्हा रिसीव्हरने तुमचा मेसेज वाचला आहे, असं सूचित होतं. जेव्हा केवळ एक टिक असते, तेव्हा तुमचा मेसेज डिलिव्हर झालेला नाही, असं सूचित होतं.
हेही वाचा : झोपलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध; दुसऱ्या दिवशीच महिलेला भोगावा लागला असा परिणाम
व्हॉट्सअॅप युझर्स ब्लू टिकही बंद करू शकतात. रीड रिसीट (Read Receipt) बंद करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्ही रीड रिसीट हा ऑप्शन बंद केला तर तुमचे मेसेज वाचले गेले आहेत की नाही हेदेखील तुम्हाला कळू शकणार नाही, कारण तुम्ही तुमचा मेसेज लपवला तर तुम्हालाही दुसऱ्यांना पाठवलेल्या ब्लू टिक्स दिसणार नाही. ब्लू टिक बंद करण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरू करावं. त्यानंतर सेटिंग मेन्यूमध्ये जावं. त्यानंतर प्रायव्हसी ऑप्शनमध्ये जावं. तिथे तुम्ही रीड रिसीट बंद करू शकता.
व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकर Wabetainfo ने व्हॉट्सअॅपवरच्या तिसऱ्या टिकबाबतचं वृत्त फेटाळून लावलं आहे. याबाबत ट्विटरवर पोस्ट करताना त्यात म्हटलं आहे, की व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट शोधण्यासाठी तिसरी ब्लू टिक विकसित करत नसून, ही एक अफवा आहे. अद्याप तरी असं कोणतंही फीचर लॉंच करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सध्या फिरत असलेली माहिती ही एक अफवा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.