मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp मध्ये ही सेटिंग कधीही करु नका; ठरू शकते घातक, कारण...

WhatsApp मध्ये ही सेटिंग कधीही करु नका; ठरू शकते घातक, कारण...

आजच्या युगात स्मार्टफोन हा जणू जगण्याचा पासवर्डच आहे. त्यामुळे स्मार्टफोन हॅक (Smartphone Hacking) होऊ न देण्याची काळजी घेणं, याला सर्वोच्च प्राधान्य देणं युझर्सच्या प्रायव्हसीसाठी (Privacy) आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्वच गोष्टींसाठी आवश्यक आहे.

आजच्या युगात स्मार्टफोन हा जणू जगण्याचा पासवर्डच आहे. त्यामुळे स्मार्टफोन हॅक (Smartphone Hacking) होऊ न देण्याची काळजी घेणं, याला सर्वोच्च प्राधान्य देणं युझर्सच्या प्रायव्हसीसाठी (Privacy) आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्वच गोष्टींसाठी आवश्यक आहे.

आजच्या युगात स्मार्टफोन हा जणू जगण्याचा पासवर्डच आहे. त्यामुळे स्मार्टफोन हॅक (Smartphone Hacking) होऊ न देण्याची काळजी घेणं, याला सर्वोच्च प्राधान्य देणं युझर्सच्या प्रायव्हसीसाठी (Privacy) आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्वच गोष्टींसाठी आवश्यक आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई 10 जुलै: अगदी किरकोळ काही जणांचा अपवाद वगळता व्हॉट्सअॅप (WhatsApp) हा आता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेला आहे. ऑफिसच्या कामापासून मित्रांशी टाइमपासच्या गप्पांपर्यंत, शुद्धलेखनापासून संगीताच्या वेगवेगळ्या रागांपर्यंत, मुलांच्या शाळेतल्या अभ्यासापासून बातम्यांचे अपडेट्स देण्यापर्यंत वेगवेगळ्या उद्देशाने व्हॉट्सअॅप ग्रुप्स वापरले जातात. आणखीही बऱ्याच कारणांसाठी व्हॉट्सअॅप वापरलं जातं. त्याच्या उपयुक्ततेमुळे आपली लोकप्रियता या इन्स्टंट मेसेजिंग अॅपने कायम राखली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपकडून सातत्याने नवनवी फीचर्सही युझर्सना दिली जातात. त्यामुळे त्याची उपयुक्तता अधिक वाढते; पण व्हॉट्सअॅपची काही सेंटिंग्ज घातकही ठरू शकतात, असं तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटतं. कारण अशा काही सेटिंग्जमुळे स्मार्टफोन हॅक होण्याचा धोका वाढू शकतो, असं त्यांचं मत आहे. आजच्या युगात स्मार्टफोन हा जणू जगण्याचा पासवर्डच आहे. त्यामुळे स्मार्टफोन हॅक (Smartphone Hacking) होऊ न देण्याची काळजी घेणं, याला सर्वोच्च प्राधान्य देणं युझर्सच्या प्रायव्हसीसाठी (Privacy) आणि त्यावर अवलंबून असलेल्या सर्वच गोष्टींसाठी आवश्यक आहे.

    Samsung Mega Monsoon Sale: हा प्रीमियम 5G स्मार्टफोन झाला अत्यंत स्वस्त, मिळेल 8GB RAM आणि 120Hz चा डिस्प्ले

    WhatsApp चा बॅकअप घेण्यासाठी फोन मेमरीबरोबर अॅपल आयक्लाउड किंवा गुगल ड्राइव्ह (Google Drive) असे पर्याय असतात. अॅपलची सुरक्षितता सर्वांत उत्तम समजली जाते; तरीही व्हॉट्सअॅपचा बॅकअप iCloudवर घेऊ नये, असं सायबर तज्ज्ञ सांगतात. कारण अॅपलच्या सर्व्हरवर एखादी गोष्ट सेव्ह झाली, की ती त्यांची मालमत्ता होते. तसंच मेसेजला व्हॉट्सअॅपकडून दिलं जाणारं एन्क्रिप्शनही रद्द होतं आणि ते डिक्रिप्ट होतात. त्यामुळे गरज पडल्यास सुरक्षा यंत्रणा ते मेसेजेस अॅपलकडून थेट घेऊ शकतात. म्हणूनच आयक्लाउड व्हॉट्सअॅप बॅकअपसाठी वापरू नये, असं तज्ज्ञ सांगतात.

    रस्त्यावरुन चालताना मोबाइलमध्ये सर्फिंगसाठी तयार केला तिसरा डोळा; पाहा कसा आहे Robotic Eye

    काही कालावधीपूर्वीच Disappearing messages हे फीचर व्हॉट्सअॅपने सादर केलं. अनेकांना हे फीचर म्हणजे वरदान वाटलं आहे. कारण किती तरी ग्रुप्स आणि पर्सनल चॅट्समध्ये दररोज अक्षरशः हजारो फॉरवर्डेड मेसेजेस येऊन पडत असतात. ते वेळच्या वेळी क्लिअर केले नाहीत, तर काही काळाने फोन हँगही होतो. अशात Disappearing messages हे फीचर सादर केल्याने सर्वांना बरं वाटलं. कारण हे फीचर ऑन केल्यानंतर सात दिवसांनी मेसेजेस आपोआप डिलीट होतात. त्यामुळे एक काम कमी झाल्यासारखं वाटलं; मात्र तज्ज्ञांच्या मतानुसार खासकरून पर्सनल चॅटिंगच्या बाबतीत प्रायव्हसीच्या दृष्टीने हे फीचर धोकादायक आहे. काही सेन्सिटिव्ह मेसेजेस असतील तर ते मेसेजचं कार्य पूर्ण झाल्यावर लगेचच डिलीट करावेत, असं तज्ज्ञ सांगतात. कारण हे फीचर वापरलं तर ते मेसेजेस सात दिवस नोटिफिकेशनमध्ये राहतात. त्या कालावधीत समोरची व्यक्ती ते मेसेजेस सेव्ह करून घेऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव असे मेसेजेस लगेचच डिलीट करावेत.

    व्हॉट्सअॅप मेसेजेसद्वारे आलेले फोटो आणि व्हिडिओ फोनमध्ये आपोआप सेव्ह (Auto Save) होण्याचं एक सेटिंग असतं. आपल्या फोनचं वाय-फाय किंवा इंटरनेट सुरू असेल, तर आपल्या नकळतही या फीचरमुळे फोटो-व्हिडिओ फोनमध्ये डाउनलोड होतात. हे सेटिंग ऑन असणं धोकादायक असतं. कारण अनेकदा फोटोज ट्रोजन हॉर्ससारखं (Trojan Horse) काम करतात. स्मार्टफोन हॅक करण्यासाठी हॅकर्सना त्यांचा सहजपणे वापर करता येतो, असं सायबर तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे तुम्हीही तुमच्या व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये (WhatsApp Settings) जाऊन हे सेटिंग पाहून घ्या. Save to Camera Roll हा पर्याय सुरू असेल, तर तो बंद करावा.

    First published:

    Tags: Technology, Whatsapp