मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /रस्त्यावरुन चालताना मोबाइलमध्ये सर्फिंगसाठी तयार केला तिसरा डोळा; पाहा कसा आहे Robotic Eye

रस्त्यावरुन चालताना मोबाइलमध्ये सर्फिंगसाठी तयार केला तिसरा डोळा; पाहा कसा आहे Robotic Eye

जेव्हा युजर फोन पाहू लागेल तेव्हा त्याचं डोकं खाली झुकलेलं असेल त्याचवेळी हा तिसरा डोळा आपलं काम सुरु करेल.

जेव्हा युजर फोन पाहू लागेल तेव्हा त्याचं डोकं खाली झुकलेलं असेल त्याचवेळी हा तिसरा डोळा आपलं काम सुरु करेल.

जेव्हा युजर फोन पाहू लागेल तेव्हा त्याचं डोकं खाली झुकलेलं असेल त्याचवेळी हा तिसरा डोळा आपलं काम सुरु करेल.

    दक्षिण कोरिया, 9 जुलै : सध्याचं युग स्मार्टफोनचं (Smartphone) आहे. स्मार्टफोनविना जगणं हे आता काल्पनिक ठरु लागलं आहे. काही लोक आपला स्मार्टफोन पाहण्यात इतके गर्क असतात की चालत असतील तर यामुळे एखाद्या गोष्टीला आपण धडकू याचे भानही त्यांना राहत नाही. काही लोक प्रवास वाहन चालवत असतानाही त्यांचं बहुतांश लक्ष स्मार्टफोनमध्ये असतं. हे धोकादायक असलं तरी सत्य आहे. अनेकदा घरात किंवा रस्त्यावर अशा प्रकारे फोन वापरल्याने अपघाताचा सामना करावा लागतो. मात्र आता अशा अपघातांपासून दूर राहता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर हे शक्य आहे कारण एका व्यक्तीने चक्क तिसऱ्या डोळ्याची (Third Eye) निर्मिती केली आहे.

    तुम्हाला हे जरा विचित्र वाटेल पण हे खरं आहे. दक्षिण कोरियातील (South Korea) एका व्यक्तीने द थर्ड आय (The Third Eye) नामक डिव्हाईसची (Device) निर्मिती केली आहे. तुम्हाला प्रवास करताना किंवा चालताना सतत स्मार्टफोन पाहायची सवय असेल आणि तुम्ही या डिव्हाईसचा वापर सुरु केला तर हे डिव्हाईस तुम्हाला पुढील अडथळा किंवा धोक्याची पूर्वसूचना देणार आहे.

    कोरोनातून बरं झाल्यानंतर हे Smartwatch ठरेल फायदेशीर; आरोग्याच्या समस्यांविषयी देईल अलर्ट

    आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियातील 28 वर्षीय डिझाईनर पेंग मिन-वूकने एक रोबोटिक डोळा (Robotic Eye) तयार केला आहे. हा डोळा कपाळावर लावून कोणतिही व्यक्ती स्मार्टफोनचा स्क्रिन बघत रस्त्यावरुन प्रवास करु शकतो. हा रोबोटिक डोळा कोणत्याही व्यक्तीच्या कपाळावर बांधता येतो. यामुळे समोर न बघता ही व्यक्ती सुरक्षितपणे चालू शकतो. या डिव्हाईसला द थर्ड आय असे नाव देण्यात आले आहे. लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट अँड इंपिरियल कॉलेजमधील तांत्रिक डिझाईनच्या एमएचा विद्यार्थी वूकने सेऊलनजीक या डिव्हाईसचे परीक्षण केले आहे. याबाबत वूक याने सांगितले की, या डिव्हाईसची निर्मिती अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी केली आहे की त्यांना आपल्याला गॅजेटसची लागलेली सवय गांभिर्यपूर्वक ओळखता यावी आणि त्यांनी स्वतः ही सवय सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

    द थर्ड आय नावाच्या या गॅझेटविषयी वूकने सांगितले की जेव्हा युजर फोन पाहू लागेल तेव्हा त्याचं डोकं खाली झुकलेलं असेल त्याचवेळी हा तिसरा डोळा आपलं काम सुरु करेल. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा मोठा अडथळा हे डिव्हाईस लावून चालत असलेल्या व्यक्तीच्या 1 ते 2 मीटर जवळपास असेल तेव्हा डिव्हाईस बीप (Beep) वाजवून धोक्याची सूचना देईल.

    सातत्याने फोन पाहण्याची सवय लागलेल्या लोकांवर टीका करताना तो लिहितो, आम्ही स्मार्टफोनवरुन नजर हटवू शकलो नाही तर भविष्यात आम्हाला अधिक डोळ्यांची गरज पडू शकते.

    First published:
    top videos

      Tags: Smartphone, Technology