जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या मोबाईलमध्ये लवकरच येणार 117 नवीन Emoji

तुमच्या मोबाईलमध्ये लवकरच येणार 117 नवीन Emoji

तुमच्या मोबाईलमध्ये लवकरच येणार 117 नवीन Emoji

तुम्ही त्याच त्याच Emoji वापरुन कंटाळला असाल, तर येत्या वर्षभरात तुमच्यासाठी खास सरप्राईज असणार आहे. येत्या संप्टेबरपर्यंत Emojiमध्ये वैविध्य पाहायला मिळेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जानेवारी : मोबाईल म्हणजे विश्व असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी! जर तुम्ही त्याच त्याच Emoji वापरून कंटाळला असाल, तर येत्या वर्षभरात काही नवीन Emoji तुमच्या फोनमध्ये तुम्हाला वापरता येणार आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल 117 नवे emoticons म्हणजेच Emoji मोबाईल आणि कम्प्युटरमध्ये वापरता येणार आहेत. Emoji 13.0 या पॅकेजचा भाग असणाऱ्या या Emoji लवकरच आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहेत. पोलर बिअर, ट्रान्सजेंडर फ्लॅग, काही बॉडी पार्ट्स यांसारख्या काही वेगळ्या 62 Emoji आहेत. तर इतर 55 Emojiमध्ये स्कीन टोनमध्ये वैविध्य आहे. यावर्षी तुमच्या फोनमध्ये येणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटनुसार त्या Emoji तुमच्या फोन किंवा कम्प्युटरमध्ये दिसतील. साधारण सप्टेंबर 2020 पर्यंत या Emoji अँड्रॉईड आणि अपल iPhone मध्ये येण्याची शक्यता आहे. विविध टेक कंपन्या या 13.0 पॅकेजमधील Emoji वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने मांडलेल्या कल्पनेनंतर ट्रान्सजेंडर फ्लॅग आणि इतर काही ट्रान्सजेंडर सिम्बॉल्सचा या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. स्त्री, पुरुष त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडर या सर्वांचा विचार करुन काही सर्वसमावेशक Emoji या पॅकेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काही नवीन गाड्यांच्या Emoji देखील 13.0 या पॅकेजमध्ये आहेत. प्राणीविश्वातील Emoji वर देखील नवनवीन प्रयोग या पॅकेजमध्ये करण्यात आला आहे. बायसन, काळी मांजर, मॅमॉथ, बिव्हर, पोलर बिअर यांसारख्या नवीन Emoji देऊन प्राणीप्रेमींना खूश करण्याचा प्रयत्न या पॅकेजमधून करण्यात आला आहे. नवीन पक्षी आणि समुद्री जीवांना देखील या पॅकेजमध्ये स्थान देण्यात आले आहे. या नवीन Emojiचा वापर करण्यासाठी नक्कीच तुम्ही उत्सुक असाल आणि लवकरच या सगळ्या Emoji आपल्याला वापरता येणार आहेत

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात