कुंपणच शेत खातंय! अँटीव्हायरस कंपनी करतेय डेटा चोरी

कुंपणच शेत खातंय! अँटीव्हायरस कंपनी करतेय डेटा चोरी

अँटीव्हायरस सॉफ्टवेअरकडून डेटा चोरी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जानेवारी : मोबाइल, कॉम्प्युटरला व्हायरस लागू नये आणि डेटा सुरक्षित रहावा म्हणून अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं. त्यामुळे इंटरनेट, मालवेअर मधून डेटा चोरीचे प्रकार थांबतात आणि आपली माहितीही सुरक्षित राहते. मात्र, आता अँटीव्हायरस सॉफ्टवेअरकडून डेटा चोरी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. अँटीव्हायरस फर्म Avast ने जगभरातील लाखो युजर्सचा डेटा विकला आहे.

Avast फ्री व्हर्जन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो लोक या सॉफ्टवेअरचा वापर करतात. आता युजर्सचा डेटा चोरी केल्याचा आरोप कंपनीवर होत आहे. कंपनीने पॉलिसीचा आधार घेत बचाव करण्याचा प्रयत्न केला.

अँटीव्हायरस कंपनी Avast ची सबसिडरी कंपनी आहे. Jumpshot नावाच्या कंपनीच्या माध्यमातून हा डेटा चोरी होत आहे. यामध्ये युजर्सच्या ब्राउजिंग हिस्ट्रीचाही समावेश आहे. सॉफ्टवेअर वापरणाऱ्या युजर्सच्या क्लिकसुद्धा यातून ट्रॅक केल्या जात असल्याचं म्हटलं जात आहे.

फक्त डेटाच नाही तर तुमच्या सोशल साइटची माहितीही गोळा केली जाते. यात लिंक्ड इन पेज, यूट्यूब व्हिडिओ, पॉर्न व्हिडिओ वेबसाइट याचा डेटाही ट्रॅक केला जातो. कंपनीने मात्र अशा प्रकारचा डेटा गोळा केल्याचा आणि त्याच्या विक्री करत असल्याच्या आरोपाला फेटाळून लावलं आहे.

वाचा : फक्त 1 रुपयात एक जीबी डेटा, जिओला टक्कर देतेय 'ही' कंपनी

कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, Jumpshot पर्सनल आयडेंटिफिकेशन इन्फर्मेशन, नाव, ईमेल अॅड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स घेत नाही. युजर्सजवळ नेहमी पर्याय असतो की डेटा शेअर करायचा की नाही. म्हणजेच युजरच्या परवानगीनेच माहिती गोळा केली जात असल्याचं कंपनीने सांगत हात झटकले आहेत.

Vodafone ची प्री-पेड ग्राहकांना ऑफर, 56 दिवस मिळणार इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग

First published: January 29, 2020, 1:44 PM IST
Tags: antivirus

ताज्या बातम्या