मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्या कामाची बातमी! Driving करताना चालानपासून वाचण्यासाठी डाउनलोड करा हे फायद्याचे App

तुमच्या कामाची बातमी! Driving करताना चालानपासून वाचण्यासाठी डाउनलोड करा हे फायद्याचे App

DigiLocker आणि mParivahan हे दोन असे अ‍ॅप्स आहेत, ज्यात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी सेव्ह करुन ठेऊ शकतात.

DigiLocker आणि mParivahan हे दोन असे अ‍ॅप्स आहेत, ज्यात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी सेव्ह करुन ठेऊ शकतात.

DigiLocker आणि mParivahan हे दोन असे अ‍ॅप्स आहेत, ज्यात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी सेव्ह करुन ठेऊ शकतात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 9 जुलै : ड्रायव्हिंग लायसन्स अनेक कामांसाठी महत्त्वाचं ठरतं. गाडी चालवताना तर ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचंच आहे. अनेकदा ड्रायव्हिंग लायसन्ससह गाडीचे इतर डॉक्युमेंट्स सोबत ठेवणं लक्षात राहत नाही. त्यात ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यास मोठी अडचण होऊ शकते. ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास दंडही भरावा लागू शकतो. अशात ड्रायव्हिंग लायसन्स सेफ आणि नेहमीच सोबत राहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये ते सेव्ह करुन ठेऊ शकता. Driving License सह इतरही आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्ही फोनमध्ये सेफली सेव्ह करुन ठेऊ शकता.

DigiLocker आणि mParivahan हे दोन असे अ‍ॅप्स आहेत, ज्यात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी सेव्ह करुन ठेऊ शकतात. फोनमध्ये सेव्ह केलेले डॉक्युमेंट्स ना चोरी होणार, ना ते कधी खराब होणार. याद्वारे तुम्ही चालानपासूनही वाचू शकता. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने DigiLocker अ‍ॅप तयार केलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्र आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, बाईक इन्शोरन्स, आरसी अशी कागदपत्र ऑनलाईन क्लाउडवर अपलोड करू शकता. यात तुम्ही 1 जीबीपर्यंत आपल्या लीगल डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपीदेखील अपलोड करू शकता. यामुळे कागदपत्र सोबत घेऊन फिरण्याची गरज लागणार नाही. जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा पोलिसांनी आधार कार्ड मागितल्यास, त्यांना ही सॉफ्टकॉपी दाखवता येऊ शकते. हे पूर्णपणे मान्य आहे.

DigiLocker वर अकाउंट तयार करणं अतिशय सोपं आहे. हे एक सरकारी अ‍ॅप आहे. यावर अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला आधार कार्डद्वारे रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर digitallocker.gov.in वेबसाईट ओपन करा. Sign Up वर क्लिक करुन त्यानंतर नाव, बर्थ डेट, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, ईमेल आयडी रजिस्टर करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वत:चा एक पासवर्ड बनवून त्यात आधार नंबर टाकावा लागेल.

आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतील. पहिला ओटीपी आणि दुसरा फिंगरप्रिंट. तुम्ही दोघांपैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करू शकता. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा User ID आणि पासवर्ड बनवावा लागेल, ज्याद्वारे तुम्ही DigiLocker मध्ये लॉगइन करू शकाल.

तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 सरकारी Apps, हे आहेत फायदे

DigiLocker मध्ये डॉक्युमेंट्स कसे अपलोड कराल?

पर्सनल अकाउंटमध्ये दोन सेक्शन्स दिसतील. पहिल्या सेक्शनमध्ये वेगवेगळ्या एजन्सीद्वारा जारी करण्यात आलेले सर्टिफिकेट्स, URL लिंक्स सारख्या गोष्टी सेव्ह करू शकता. तर दुसऱ्या सेक्शनमध्ये तुमच्याद्वारे अपलोड केलेले सर्टिफिकेट्स, URL लिंकचे मिनी डिटेल्स दिसतील. दुसऱ्या पर्यायात शेअर आणि ई-साइन करण्याचा ऑप्शनही मिळेल.

सर्टिफिकेट्स अपलोड करण्यासाठी My Certificate पर्याय निवडा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करुन फोनवरुन आपलं सर्टिफिकेट अ‍ॅपमध्ये अ‍ॅड करा. अशाप्रकारे सर्व डॉक्युमेंट्स DigiLocker मध्ये सेव्ह करू शकता.

mParivahan -

mParivahan अ‍ॅप रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून लाँच करण्यात आलं आहे. याद्वारे तुम्ही सहजपणे तुमच्या जवळच्या RTO ऑफिस आणि प्रदूषण चाचणी केंद्र कुठे आहे याबाबत माहिती घेऊ शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही Moke Driving License Test ही देऊ शकता. तसंच, सेकंड हँड व्हिकल खरेदी करतानाही हे अ‍ॅप कार-बाईक रजिस्ट्रेशनसंबंधी सर्व डिटेल्सही देण्यास मदत करेल.

mParivahan App गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरवरुन डाउनलोड करू शकता. त्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्यावर क्लिक करा. Sign in केल्यानंतर मोबाईल नंबर रजिस्टर करा आणि OTP टाकून नंबर व्हेरिफाय करा.

mParivahan अ‍ॅपच्या होम स्क्रिनवर असलेल्या RC वर टॅप करा. सर्च फिल्डमध्ये आपल्या गाडीचा नंबर टाका आणि सर्च करा. हे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड नंबरशी जोडलेल्या डॉक्युमेंट्सला आपोआप फेच करेल. आता Add to Dashboard वर क्लिक करा आणि आपलं RC अ‍ॅड करा.

First published:

Tags: Driving license, Government apps, While driving