मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp Hacking: हॅकर्सही करू शकणार नाही तुमचं Account Hack, WhatsApp चं भन्नाट फीचर

WhatsApp Hacking: हॅकर्सही करू शकणार नाही तुमचं Account Hack, WhatsApp चं भन्नाट फीचर

व्हॉट्सअ‍ॅप नुकतंच एका Flash Call नावाच्या फीचरवर काम करत आहे, ज्यात कोणी तुमचं WhatsApp लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यास, युजरला त्यांचा फोन नंबर आपोआप वेरिफाय करण्याची मंजूरी द्वावी लागेल.

व्हॉट्सअ‍ॅप नुकतंच एका Flash Call नावाच्या फीचरवर काम करत आहे, ज्यात कोणी तुमचं WhatsApp लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यास, युजरला त्यांचा फोन नंबर आपोआप वेरिफाय करण्याची मंजूरी द्वावी लागेल.

व्हॉट्सअ‍ॅप नुकतंच एका Flash Call नावाच्या फीचरवर काम करत आहे, ज्यात कोणी तुमचं WhatsApp लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यास, युजरला त्यांचा फोन नंबर आपोआप वेरिफाय करण्याची मंजूरी द्वावी लागेल.

नवी दिल्ली, 25 मे : सध्या कोरोना काळात अकाउंट हॅक होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात WhatsApp ही सामिल आहे. WhatsApp अशा स्कॅमपासून वाचवण्यासाठी एका नव्या फीचरवर काम करत आहे. WABeta च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप नुकतंच एका Flash Call नावाच्या फीचरवर काम करत आहे, ज्यात कोणी तुमचं WhatsApp लॉग-इन करण्याचा प्रयत्न केल्यास, युजरला त्यांचा फोन नंबर आपोआप वेरिफाय करण्याची मंजूरी द्वावी लागेल.

युजर्सला द्वावी लागेल मंजूरी -

WhatsApp चं नवं फीचर Flash Call, आपल्या फोनच्या कॉल-लॉगपर्यंत पोहचण्यासाठी युजर्सच्या मंजुरीची आवश्यकता असेल. त्यानंतर हे फीचर आपोआप वेरिफाय करेल, की कोणी तुमच्या WhatsApp Account चा अ‍ॅक्सेस देण्यासाठी कॉल केला आहे की नाही. हे फीचर सध्या अँड्रॉईड Beta वर्जन 2.21.11.7 वर सर्वात आधी पाहण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या स्क्रिनशॉटनुसार, Flash Call एक पर्यायी फीचर असेल, जे आपल्या आवडीनुसार युजर्स वापरु शकतात. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, युजर्सला आधी हे ठरवावं लागेल, की आपल्या कॉल-लॉगचा अ‍ॅक्सेस WhatsApp ला द्यायचा आहे की नाही.

(वाचा - विजेशिवाय चालतात हे पॉवरफुल AC, महिन्याला होईल पैशांची मोठी बचत)

Flash Call -

WhatsApp ने युजर्सला फ्रॉडबाबत सावध केलं आहे, ज्यात सायबर क्रिमिनल्स युजर्सला कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगतात आणि त्यांना मेसेज पाठवतात. मेसेज पाठवून युजर्सकडे त्यांच्या फोनवर आलेला OTP शेअर करण्यास सांगतात.

(वाचा - लॉकडाउनमध्येच Aadhaar Card हरवलं? कुठेही न जाता घरबसल्या असं बनवा नवं आधार कार्ड)

हे फ्रॉड करणारे कंपनीच्या नावाने, कंपनीनेच प्रतिनिधी असल्याचं सांगत युजर्सला, तुमचं अकाउंट वेरिफाय करण्याची गरज असून, असं न केल्यास अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट केलं जाईल, असं सांगून घाबरवतात. यामुळे युजर्सही अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट होईल या भीतीने फोनवर आलेला OTP या फ्रॉड लोकांसोबत शेअर करतात आणि स्वत:चा व्हॉट्सअ‍ॅपचा अ‍ॅक्सेस घालवतात. त्यामुळे कधीही कोणीही OTP  मागितल्यास, तो कोणाशीही शेअर करू नका. आपण मागणी केल्याशिवाय OTP येत नाही, त्यामुळे थेट मोबईलवर ओटीपी आल्यास सावध व्हा.

First published:
top videos

    Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp messages