Home /News /technology /

Whatsapp वर आता शेड्युल करता येणार मेसेज, काय आहे नवीन फिचर जाणून घ्या

Whatsapp वर आता शेड्युल करता येणार मेसेज, काय आहे नवीन फिचर जाणून घ्या

कुणाचा वाढदिवस लक्षात राहत नसेल तर व्हॉट्सॲपमध्ये करा हा बदल आपोआप पाठवला जाईल मेसेज

    मुंबई, 2 डिसेंबर : व्हॉट्सॲप (WhatsApp) हे खूप लोकप्रिय ॲप आहे. यावर लोकं कामात व्यस्त असताना देखील एकमेकांशी बोलू शकतात. अनेकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील आपण यावरून मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवत असतो. परंतु आपल्या कामात व्यस्त असल्याने कधी हे शक्य होत नाही. परंतु यासाठी आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार असून यामुळे तुम्ही वेळेच्या आधीच मेसेज सेट करून ठेवू शकता. यासाठी वाढदिवसाच्या(Birthday) शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत जागे राहण्याची गरज नसून हे टेन्शन राहणार नाही. या सोप्या पद्धतीमुळे तुम्ही यातून सुटका करून घेऊ शकता. व्हॉट्सॲप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी दरवेळी नवीन फिचर आणत असते. यामध्ये चॅटिंग, व्हिडिओ, कॉलिंग आणि बिझनेस संबंधित काही नवीन फीचरचा नुकताच समावेश केला आहे. व्हॉट्सॲपवर मेसेज शेड्युल करायचा असेल तर मोठी चिंता आहे. वेळेच्या आधी तुम्ही मेसेज सेट करून ज्याला पाठवायचा आहे त्याला त्या वेळेतच पाठवू शकता. यामध्ये तुम्ही रात्री 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता किंवा एखाद्या मीटिंगसंबंधी मेसेज करायचा असेल तर तुम्हाला या सोप्या पद्धतीची मोठी मदत होणार आहे. अँड्रॉइड फोनमध्ये या पद्धतीने करा मेसेज शेड्युल 1)सर्वात आधी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला थर्ड पार्टी ॲप SKEDit डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर त्यामध्ये साइन इन करा. 2) Login केल्यानंतर मेन मेन्यूमध्ये दिलेल्या WhatsApp पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या ॲप काही गोष्टींसाठी परमिशन मागेल. 3) त्यानंतर Enable Accessibility वर क्लिक करून Use service वर क्लिक करायचे आहे. यामध्ये ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज शेड्युल करायचा आहे त्याचं नाव टाकायचे आहे. 4) त्यानंतर मेसेज टाईप करून वेळ आणि तारीख सेव्ह करा. 5) यानंतर तुम्ही सेट केलेल्या वेळी आपोआप मेसेज त्या व्यक्तीला जाईल. हे वाचा-कौतुकास्पद! भारतात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्त रुग्णावर फुफ्फुसांचं प्रत्यारोपण Whatsapp वर या पद्धतीने करा ऑटोमॅटिक रिप्लाय यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर विविध थर्ड पार्टी ॲप मिळतील. यामधीलच AutoResponder for WA हे देखील एक ॲप आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही ऑटोमॅटिक रिप्लाय देऊ शकता. या ॲपचा वापर तुम्ही फेसबुक,(facebook ) इंस्टाग्राम(instagram ) आणि व्हॉट्सॲपसाठी (WhatsApp) देखील करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर हे ॲप उघडून यावरील उजव्या बाजूला असणाऱ्या प्लस या आयकॉनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला ज्या मेसेजला रिप्लाय पाठवायचा आहे तो मेसेज टाईप करा. मेसेज टाईप केल्यानंतर Reply Message असा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्हाला मेसेज सेव्ह करायचा असून नंतर तो आपोआप ज्याला पाठवायचा आहे त्याला पाठवला जाईल. यामध्ये तुम्ही हा मेसेज कुठे पाठवायचा आहे हे देखील सेट करू शकता. यामध्ये तीन पर्याय देण्यात आले आहेत. ग्रुपमध्ये, वैयक्तिक, किंवा दोन्हीमध्ये असे तीन पर्याय दिले आहेत. ही सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर टिक मार्कवर क्लिक करायचे आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Techonology, Whatsapp

    पुढील बातम्या