नवी दिल्ली, 2 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये कोरोनाग्रस्तावर हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. पण सर्वात अभिमान आणि कौतुकाचं बाब म्हणजे भारतात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्त रुग्णावर फुफ्फुसांचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाग्रस्त 31 वर्षीय व्यक्तीवर दिल्लीतील खासगी रुग्णालयात फुफ्फुसांचं यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात मंगळवारी उशिरा माहिती देण्यात आली. रुग्णालयाच्या निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर उत्तर भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या टीमनं तब्बल 10 तासांच्या अथक प्रयत्नांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई इथे राहणाऱ्या तरुणाला फुफ्फुसांच्या गंभीर आजारानं ग्रासलं होतं. दान करण्यात आलेली फुफ्फुसं 42 वर्षीय महिलेची असल्याची माहिती मिळाली आहे. एका रस्ते अपघातात या महिलेचा मृत्यू झाला होता. राजस्थानच्या जयपूरमधून फुफ्फुसांना दिल्लीला आणण्यात आलं आणि 31 वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आलं. हे वाचा- बबिताच्या फोटोवर टप्पूची अशी कमेंट, नेटकऱ्यांनी TVच्या अर्जुन-मलायकाची दिली उपमा डॉ. राहुल चंडोला यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रुग्णाची फुफ्फुस खूप खराब होती आणि हृदयाचे कार्यही कमी होत होते. फुफ्फुसातील सर्व प्रत्यारोपणांपैकी सर्वात नाजूक असतात. बहुतेक देणगीदार रस्ते अपघाताला बळी पडत आहेत. फुफ्फुस अगदी नाजूक अवयव असल्यानं लवकर संसर्ग होण्याचा मोठा धोका देखील असतो. उत्तर भारतात पहिल्यांदाच फुफ्फुसांचं यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. ज्या रुग्णावर हे प्रत्यारोपण केलं त्याला कोरोनाची लागण झाली होती. 28 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.