मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं टेस्टिंग सुरू

आता चॅट आणखी सोपं होणार, WhatsApp च्या नव्या फीचरचं टेस्टिंग सुरू

व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट फिल्टर फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवं चॅट फिल्टर अँड्रॉइड, iOS आणि डेस्कटॉप युजर्ससाठीही उपलब्ध असेल.

व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट फिल्टर फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवं चॅट फिल्टर अँड्रॉइड, iOS आणि डेस्कटॉप युजर्ससाठीही उपलब्ध असेल.

व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट फिल्टर फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवं चॅट फिल्टर अँड्रॉइड, iOS आणि डेस्कटॉप युजर्ससाठीही उपलब्ध असेल.

नवी दिल्ली, 17 मे : WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स अपडेट करत असतं. आता पुन्हा एकदा WhatsApp एका नव्या अपडेटवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपकडून एका नव्या चॅट फिल्टर फीचरचं टेस्टिंग सुरू आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवं चॅट फिल्टर अँड्रॉइड, iOS आणि डेस्कटॉप युजर्ससाठीही उपलब्ध असेल.

इन्स्टंट मेसेजिंद प्लॅटफॉर्मची नवी सुविधा केवळ बिजनेस अकाउंटसाठी असेल. यामुळे त्यांना अनेक चॅट अधिक सहजपणे मॅनेज करण्याची परवानगी मिळेल. यामुळे युजरला चॅट अधिक सहजपणे शोधण्यास मदत होईल.

फिल्टरमध्ये unread chats, कॉन्टॅक्ट्स, नॉन कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुपही सामिल आहेत. यापैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रिनवर केवळ तेच दिसेल, जे तुम्ही सिलेक्ट केलं आहे. यामुळे फास्ट नेव्हिगेट करण्यासाठी मदत मिळेल. WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटद्वारे हे फिल्टर बटण बिजनेस अकाउंटसाठी असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच हा पर्याय डेस्कटॉपवर सर्च बारवर टॅप केल्यावरही मिळेल.

सध्या हे चॅट फिल्टर बीटामध्ये आहे आणि व्हॉट्सअॅप डेस्कटॉप बीटा v2.2216.40 वर वापरता येऊ शकतं. हे फीचर व्हॉट्सअॅप बिजनेसवर काही दिवसांनंतर येईल, त्यानंतर ते स्टेबल वर्जनमध्ये येईल.

हे वाचा - केवळ या एका नंबरने हॅक होईल WhatsApp Account, चुकूनही करू नका डायल

दरम्यान, WhatsApp युजर्ससाठी आणखी एक नवं फीचर येणार आहे. WhatsApp एका नव्या फीचरवर काम करत आहे ज्याचं नाव Companion मोड आहे. लेटेस्ट बीटा अपडेटमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp चं हे फीचर युजरला WhatsApp ला वेगवेगळ्या फोनमध्ये Login करण्याची परवानगी देईल. हे मल्टी डिव्हाइस फीचरचं एक्सटेंशन आहे, जे काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आलं होतं अशी माहिती होती. परंतु WABetaInfo ने हे फीचर 2.22.11.10 अँड्रॉइड बीटा वर्जनमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. शेअर करण्यात आलेल्या स्क्रिनशॉटनुसार WhatsApp लवकरच Companion Mode लाँच करेल. यामुळे युजर्स WhatsApp अकाउंटला दुसऱ्या अकाउंटमध्ये लिंक करू शकतात.

First published:
top videos

    Tags: WhatsApp chats, Whatsapp New Feature, WhatsApp user