नवी दिल्ली, 16 मार्च : व्हॉट्सअॅप (WhatsApp) हा सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) मानला जातो. कंटेंट, फोटोज, ऑडिओ तसंच व्हिडिओ शेअरिंगसाठी व्हॉट्सअॅपचा प्रामुख्याने वापर केला जातो. युजर्सना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी अलीकडच्या काळात व्हॉट्सअॅपने अनेक फीचर्स लॉंच केले आहेत. आता या अॅपने पुढचं पाऊल टाकत एक नवं फीचर युजर्ससाठी आणलं आहे. ग्लोबल व्हॉईस प्लेअर फीचर (Global Voice Player Feature) असं याचं नाव असून, मागील बीटा अपडेटमध्ये हे फीचर दिसून आलं आहे. तसंच व्हॉट्सअॅप डेस्कटॉपवरही याचं टेस्टिंग करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी (Android Beta Users) हे फीचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. हे फीचर युजर्सना विशेष फायदेशीर ठरणार आहे. एखाद्यावेळी आपल्या व्हॉट्सअॅपवर मोठी व्हॉइस नोट (Voice Note) येते. ही व्हॉइस नोट ऐकत तुम्हाला अन्य मेसेजेसही वाचायचे असतात. पण या दोन्ही गोष्टी करणं काहीसं अशक्य होतं. मात्र, युजर्सची ही अडचण व्हॉट्सअॅप दूर करणार आहे. हे अॅप आता ग्लोबल व्हॉइस प्लेअर फीचर लॉंच करत असून, यामुळे युजर्सना व्हॉइस नोट ऐकणं सुलभ होणार आहे. आयओएस (iOS) बीटा टेस्टरने या फीचरचा अनुभव यापूर्वी घेतला आहे. कारण आयओएस बीटा टेस्टर्ससाठी हे फीचर यापूर्वीच रोल आउट करण्यात आलं आहे.
हे वाचा - WhatsApp Update:एकाहून अधिकांना फॉर्वर्ड करता येणार नाही मेसेज,नवं फीचर कसं असेल
याबाबत व्हॉट्सअॅपला ट्रॅक करणाऱ्या WaBetaInfo या साईटने सांगितलं, ग्लोबल व्हॉइस प्लेअर अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी रोल आऊट केलं जाणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स वेगवेगळ्या चॅट्सवर मेसेज करणं आणि व्हॉइस नोट ऐकणं या दोन्ही गोष्टी एकाचवेळी करू शकणार आहेत. कितीही मोठी व्हॉइस नोट असली तरी आता युजर्सला दुसऱ्या चॅटवरील मेसेजला उत्तर देताना व्हॉइस नोट ऐकता येणार आहे. सध्या या अॅपवर कोणत्याही स्वरुपाची व्हॉइस नोट ऐकत असताना युजर त्या चॅटमधून (Chat) बाहेर पडला की व्हॉइस नोट बंद होते. ही नोट पुन्हा ऐकण्यासाठी त्याला त्यावर परत जावं लागतं. मात्र आता नव्या फीचरमुळे हा त्रास वाचणार आहे. नव्या फीचरमध्ये युजरला व्हॉइस नोटचा स्पीड वाढवण्याचा ऑप्शनही मिळणार आहे. ग्लोबल व्हॉइस प्लेअर रोल आऊट झाल्यावर व्हॉइस नोट ऐकणं आणि मॅनेज करणं अधिक सोपं होणार आहे. जर तुम्ही अँड्रॉइड बीटा टेस्टर असाल तर व्हॉट्सअॅप ओपन करून एखादा व्हॉइस मेसेज सुरु करावा आणि चॅट्स लिस्टमध्ये परत जावं. यावेळी तुम्हाला जर एखादा नवा प्लेअर बार दिसला तर ग्लोबल व्हॉइस फीचर तुमच्या अॅपमध्ये इनेबल केलं आहे, हे समजेल. विशेष म्हणजे हे फीचर केवळ व्हॉइस नोट्सपर्यंतच मर्यादित नाही. हा नवा प्लेअर इनकमिंग आणि आउटगोईंग ऑडिओ फाईल्सशी (Audio Files) सुसंगत आहे. यात अलीकडे काही बदलही करण्यात आले आहेत. जर तुम्ही व्हॉइस नोट ऐकताना अन्य चॅट्स थ्रेडवर गेलात आणि नवा प्लेअर तुम्हाला दिसला नाही तर चिंता करण्याची गरज नाही. कारण हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी सध्या रोल आउट करण्यात आलं आहे. लवकरच हे फीचर सर्व अँड्रॉइड युजर्ससाठी रोल आउट केलं जाणार आहे.
हे वाचा - पेट्रोल पंपावर ATM Card ने पेमेंट करता? सावधान! अशी होतेय फसवणूक
या नव्या फीचरसोबतच व्हॉट्सअॅप डिसअॅपियरिंग मेसेजच्या (Disappearing Message) कालमर्यादेत नव्याने बदल करत आहेत. नुकताच या फीचरचं टेस्टिंग करण्यात आलं आहे. जेव्हा तुम्ही एखादा डिसअॅपियरिंग मेसेज सेंड करता, तेव्हा तो ठराविक वेळेपेक्षा जास्त राहू नये, अशी तुमची इच्छा असते. आता नव्या बदलामुळे, युजर्सला त्यांच्या मर्जीनुसार डिसअॅपियरिंग मेसेजचा कालावधी निश्चित करता येणार आहे.