मुंबई, 22 फेब्रुवारी : व्हॉटसअॅपकडून सुरक्षिततेचा दावा जरी केला जात असला तरी डेटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सध्या व्हॉटसअॅपचं ग्रुप चॅटिंग धोक्यात आहे. कारण तुमच्या व्हॉटसअॅप ग्रुपची लिंक गुगलवर सर्च केल्यानंतर सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुमचा प्रायव्हेट असलेला ग्रुप कोणीही जॉईन करू शकतो. मदरबोर्डने दिलेल्या बातमीनुसार गुगल सर्चमध्ये प्रायव्हेट व्हॉटसअॅप ग्रुपची इनव्हाइट लिंक मिळत आहे. या बातमीनंतर गुगलने यावर कारवाई करत इनवाइट लिंकची माहिती दाखवणं बंद केलं आहे. पण समोर आलेली त्रुटी खूप धक्कादायक होती. व्हॉटसअॅपच्या या त्रुटीचा फायदा उठवून कोणीही तुमच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये अॅड होऊ शकलं असतं. मदरबोर्डच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, गुगलवर मिळणाऱ्या लिंकच्या मदतीने एक ग्रुप जॉइन केला आणि ग्रुपच्या सर्व मेंबरचा नंबर त्यांना घेता आले.
WhatsApp didn’t comment on the search engine indexing and implied that admins are on their own
— Jane Manchun Wong (@wongmjane) February 21, 2020
I guess this is now a feature, that WhatsApp will not do their very least of unlisting the publicly-accessible group links from search engines
via @josephfcox: https://t.co/VD5mB0kQLv pic.twitter.com/JyIvdklhsH
मदरबोर्डने म्हटलं की, तुमचा व्हॉटसअॅप ग्रुप सुरक्षित नाही. गूगलवर सर्च करून कोणीही तुमच्या ग्रुपमध्ये अॅड होऊ शकतं. अॅप रिव्हर्स इंजिनिअर जेन वोंग यांनी म्हटलं की, गुगलवर site: chat.whatsapp.com सर्च केल्यानंतर जवळपास 4,70,000 रिझल्ट मिळत होते. यामध्ये ग्रुप इनव्हाइटच्या लिंक होत्या. वाचा : WhatsApp मुळे जास्त इंटरनेट डेटा जातोय? वापरा या टिप्स व्हॉटसअॅपच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, ज्या ग्रुपच्या इनव्हाइट लिंक सोशल मिडीया साइट किंवा गुगलवर शेअर केल्या आहेत त्यांच्याच ग्रुपच्या लिंक सर्च केल्यावर मिळतात. त्यामुळे युजर्सनी ग्रुप इनव्हाइट लिंक शेअर करताना काळजी घ्या. वाचा : सावधान! WhatsApp सह इतर अॅप्स वापरून तुमचं बँक खातं केलं जातंय रिकामं

)







