नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट (WhatsApp Account) कधी आपोआप लॉगआउट (Logout) झालं का? व्हॉट्सअॅपमध्ये एका विचित्र समस्येचा सामना करावा लागला होता, ज्यावेळी युजर्सचं अकाउंट आपोआप लॉगआउट झालं होतं. अकाउंट लॉगआउट झाल्यानंतर युजर्सला एक मेसेजही मिळाला होता, जो अॅप ओपन केल्यानंतर फोनच्या स्क्रिनवर फ्लॅशवर होत होता.
स्क्रिनवर आलेल्या मेसेजने अनेक युजर्सची चिंता वाढवली होती. या मेसेजमध्ये लिहिलं होतं, की तुमच्या हँडसेटवर व्हॉट्सअॅपचा हा नंबर आता रजिस्टर्ड नाही. अकाउंट लॉगआउट होण्यामुळे दुसऱ्या फोनवर अकाउंट रजिस्टर करावं लागेल. जर तुम्ही असं केलं नाही, तर नंबर वेरिफाय करुन पुन्हा आपल्या अकाउंटमध्ये लॉगइन करा.
व्हॉट्सअॅपवर असा मेसेज आलेले अनेक युजर्स चिंतेत असून त्यांना हा सायबर अटॅक असल्याचा संशय येत होता. परंतु ज्या युजर्सला असा मेसेज आला, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. असा मेसेज येणं हा कोणताही सायबर हल्ला किंवा फ्रॉड नव्हता. तर व्हॉट्सअॅपमध्येच आलेला एक बग होता. व्हॉट्सअॅपसंबंधी अपडेट्स ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने याबाबत ट्विटदेखील केलं आहे.
WABetaInfo च्या ट्विटनंतर युजर्सला दिलासा मिळाला, तरी कंपनीकडून या बगबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे.
दरम्यान, Kaspersky ने नुकतंच व्हॉट्सअॅप युजर्सवरील सायबर क्राईममध्ये मोठी वाढ झाल्याचं सांगितलं होतं. Kaspersky ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप हॅकिंगपासून वाचण्याचा सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे, कोणत्याही अनोळखी युजरकडून पाठवण्यात आलेल्या मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नका. या बनावट लिंक असतात, ज्या एखाद्या फेक वेबसाईटवर युजरला रिडायरेक्ट करतात. या फेक वेबसाईटद्वारे हॅकर सहजपणे युजरचं बँक अकाउंट खाली करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.