जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp Alert! मित्रांच्या नावे होतेय फसवणूक, तुम्हालाही असा मेसेज आल्यास सावध व्हा

WhatsApp Alert! मित्रांच्या नावे होतेय फसवणूक, तुम्हालाही असा मेसेज आल्यास सावध व्हा

रेकॉर्ड केलेला व्हॉइस मेसेज डिलीट करायचा असल्यास Trash वर क्लिक करा आणि मेसेज योग्य असल्यास तो पाठवण्यासाठी Send वर क्लिक करा.

रेकॉर्ड केलेला व्हॉइस मेसेज डिलीट करायचा असल्यास Trash वर क्लिक करा आणि मेसेज योग्य असल्यास तो पाठवण्यासाठी Send वर क्लिक करा.

WhatsApp Users ला आता ‘Friend In Need’ स्कॅमबाबत इशारा दिला जात आहे. WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 59 टक्के लोकांसोबत मेसेजद्वारे अशी फसवणूक झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : तुम्ही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. फ्रॉड करण्यासाठी हॅकर्सकडून आता नवीन पद्धतीचा वापर केला जात आहे. WhatsApp Users ला आता ‘Friend In Need’ स्कॅमबाबत इशारा दिला जात आहे. WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 59 टक्के लोकांसोबत मेसेजद्वारे अशी फसवणूक झाली आहे. ‘Stop. Think. Call’ कँपेन - WhatsApp ने आता नॅशनल ट्रेडिंग स्डँडर्ड्ससह भागीदारी केली आहे. जेणेकरुन युजर्सला स्कॅम आणि इतर अशा फ्रॉडबाबत इशारा दिला जाऊ शकेल. ‘Stop. Think. Call’ कँपेनचा उद्देश लोकांना सायबर क्रिमिनल्सद्वारा फ्रॉडपासून वाचवणं, त्याबाबत माहिती देणं असा आहे. या कँपेनचा उद्देश कोणत्याही मेसेजला उत्तर देण्याआधी थांबा आणि तुमचं टू-फॅक्टर ऑथेटिंकेशन ऑन आहे का हे तपासा, यामुळे अकाउंट सुरक्षित ठेवण्यास मदत होते. आलेल्या लिंक, मेसेजबाबत विचार करा. आलेल्या लिंकमध्ये पैसे, खासगी माहिती तर मागितली जात नाही ना हे तपासा. तसंच एखाद्या मित्राच्या नावाने, कुटुंबियांच्या नावाने पैसे मागितले जात असल्यास त्या व्यक्तीला फोन करुन आधी चौकशी करा. असा Stop. Think. Call या कँपेनचा उद्देश आहे. काय आहे Friend In Need Scam - या स्कॅममध्ये सायबर क्रिमिनल्स अशा व्यक्तीचं खातं हॅक करतात, ज्याला तुम्ही ओळखता. त्यानंतर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक लोकांना मेसेज पाठवले जातात. फोन हॅक झाल्यामुळे हॅकर्स इतरही मेसेज वाचू शकतात. हॅकर्स स्वत: तुमच्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींशी चॅट करतात आणि पैशांची मागणी करतात. आपल्याच मित्रांने पैसे मागितले असल्याचं तुम्हाला वाटू शकतं. परंतु हे मेसेज हॅकर्सने केलेले असतात. त्यामुळे कोणीही कोणत्याही व्यक्तीच्या नावाने पैसे मागितल्यास, त्या व्यक्तीला कॉल करुन तपास करणं महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात