Home /News /technology /

Tesla car भारतात लाँचिंग न होण्याचं नेमकं काय आहे कारण? इलॉन मस्क यांनी केला हा खुलासा

Tesla car भारतात लाँचिंग न होण्याचं नेमकं काय आहे कारण? इलॉन मस्क यांनी केला हा खुलासा

टेस्ला कंपनीकडून यासंदर्भात भारत सरकारशी (Indian Government) सातत्यानं चर्चा सुरू आहे.

  नवी दिल्ली, 13 जानेवारी-  टेस्ला कंपनीची कार (Tesla Car) भारतात कधी लाँच होणार याविषयी वाहनप्रेमींच्या उत्सुकता ताणल्या जात आहेत. काही तांत्रित बाबींमुळे टेस्लाचे (Tesla car in india launching) लाँचिंग होण्यास विलंब होत असला तरी कार लवकरच देशातील रस्त्यांवर दिसू शकते. टेस्ला कंपनीकडून यासंदर्भात भारत सरकारशी (Indian Government) सातत्यानं चर्चा सुरू आहे. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क (CEO Elon Musk) यांनी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार (Electric Car) लाँच करण्याबाबत सांगितलं की, 'भारतात कंपनीसमोर अजूनही अनेक आव्हानं आहेत'. दुसरीकडे आयात शुल्क कमी करण्याच्या टेस्लाच्या मागणीवर सरकार लवकरच निर्णय घेईल, असं नीती आयोगानं स्पष्ट केलं आहे. 'टेस्लाच्या भारतातील लाँचिंगबाबत काय अपडेट आहेत'? ही कार अद्भूत असून, ती जगाच्या कानाकोपऱ्यात असली पाहिजे', अशी विचारणा एका व्टिटर युजरनं (Twitter User) अॅलन मस्क यांच्याकडे केली होती. त्यावर मस्क यांनी सांगितलं की, 'सध्या कंपनीला भारतात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. टेस्ला या समस्या सोडवण्यात व्यग्र आहे'. आयत शुल्क ठरतेय अडथळा गेल्या वर्षी जुलैमध्ये इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क (Import Duty) कमी करावे, अशी मागणी टेस्लानं पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार बाहेरून आयात करून भारतात त्याची विक्री करू इच्छित आहे. परंतु, जास्त आयात शुल्क हा त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत आहे. आयात शुल्क कमी करण्याच्या टेस्लाच्या मागणीला देशातंर्गत इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी विरोध दर्शवला आहे. आयात शुल्क कमी केल्यास देशातंर्गत उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल, असं या उत्पादकांचं म्हणणं आहे.

  ठरलं! टेस्ला कारची भारतात एन्ट्री, ‘या’ शहरात असेल ऑफिस!

  लवकरच निर्णय शक्य  शुक्ल कमी करण्याच्या टेस्लाच्या मागणीवर लवकरच विचार होऊ शकतो. भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याच्या अटीवर सरकार टेस्लाच्या मागणीचा सकारात्मक विचार करू शकते. नीती आयोगाचे (NITI Aayog) सीईओ अमिताभ कांत यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, 'टेस्लाच्या प्रस्तावाचं मूल्यांकन सुरू असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो'. नीती आयोग हा सरकारचा थिंक टॅंक असून जो धोरण ठरवण्यासाठी प्रशासनाला सल्ला देतो. अॅलन मस्क भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्यास अनुकूल आहेत. परंतु, टेस्ला कार प्रथम भारतात लाँच व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. सध्याचे 60 टक्के आयात शुल्क कमी करून ते 40 टक्के करण्यात यावे, अशी मागणी मस्क यांनी केलेली आहे. 'चीनमध्ये बनवलेली कार चालणार नाही' 'बिझनेस टुडे'च्या एका वृत्तानुसार, 2021 मध्ये झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटलं होतं की, 'टेस्ला भारतात येण्यास उत्सुक आहे. मी टेस्लाच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय, चीनमध्ये (China) कारची निर्मिती करून त्या भारतात विकू नका. माझ्या मनात जे होतं ते मी त्यांना सांगितलं. त्याऐवजी तुम्ही भारतात या, इथेच कार निर्मिती करा. त्यांची विक्री आणि निर्यात करा. सरकार तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल. टेस्ला लवकरच भारतात दाखल होईल. त्यांनी मार्केटिंगदेखील सुरू केलं आहे', असं गडकरी यांनी सांगितलं होतं.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Tech news, Tesla

  पुढील बातम्या