मराठी बातम्या /बातम्या /मनी /

दुर्लक्ष न करता 31 डिसेंबर आधी ही कामे करुन घ्या, नवीन वर्षात त्रास होणार नाही

दुर्लक्ष न करता 31 डिसेंबर आधी ही कामे करुन घ्या, नवीन वर्षात त्रास होणार नाही

ईपीएफ खात्यात (EPF Account E nomination) नोंदणी करण्यापासून आयटीआर फाइल (ITR Filing Last Date) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला कोणते काम पूर्ण करायचे आहेत यावर एक नजर टाकूया.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 22 डिसेंबर : यंदाचं वर्ष संपायला काही दिवस उरले आहे. नवीन वर्षात प्रवेश करण्याआधी म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत सर्वसामान्यांना त्यांची काही कामे पूर्ण करावी लागतील, नाहीतर त्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ईपीएफ खात्यात (EPF Account E nomination) नोंदणी करण्यापासून आयटीआर फाइल (ITR Filing Last Date) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. 31 डिसेंबरपूर्वी तुम्हाला कोणते काम पूर्ण करायचे आहेत यावर एक नजर टाकूया.

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे

सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR return) भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली होती. नवीन आयकर पोर्टल आणि कोरोना व्हायरसमुळे आलेल्या अडचणींमुळे मोदी सरकारने मुदत वाढवली होती. आता दंड टाळण्यासाठी करदात्यांना 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर भरावा लागेल.

जीवन प्रमाणपत्र (Life Certificate Submission)

तुम्हीही पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. पेन्शनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा निवृत्ती वेतन मिळणे बंद होईल. वर्षातून एकदा, पेन्शनधारकांना त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजेच जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावे लागते, परंतु यावेळी ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र सादर केल्यावर पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे उघड होत असते.

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम?

तुमच्या डीमॅट/ट्रेडिंग खात्याचे KYC (Demat and Trading Account KYC)

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे KYC करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. डीमॅट, ट्रेडिंग खात्यात नाव, पत्ता, पॅन, वॅलिड मोबाइल नंबर, वय, KYC अंतर्गत योग्य ईमेल आयडी अपडेट करणे आवश्यक आहे.

UAN शी आधार लिंक करणे (Aadhaar link with UAN)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांना UAN क्रमांक आधारशी जोडणे आवश्यक आहे. UAN ला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. EPFO गुंतवणूकदारांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य झाले आहे. असे न केल्यास येत्या काही दिवसांत त्रास होऊ शकतो आणि पीएफ खाते बंद होऊ शकते.

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत 1 जानेवारीपासून बदलणार, काय आहे RBI चे नवीन नियम?

31 डिसेंबरपर्यंत कमी व्याजावर गृहकर्ज मिळेल

तुम्ही बँक ऑफ बडोदा (BoB) चे ग्राहक असल्यास, तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्ज मिळवू शकता. सणासुदीच्या हंगामात, BoB ने गृहकर्जाचा दर 6.50 टक्क्यांपर्यंत कमी केला होता, जो 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे.

First published:

Tags: Home Loan, Income tax, Year Ender