जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फक्त AI नव्हे, तर इतर नवं तंत्रज्ञानही बदलेल युजर्सचं अनुभवविश्व

फक्त AI नव्हे, तर इतर नवं तंत्रज्ञानही बदलेल युजर्सचं अनुभवविश्व

फक्त AI नव्हे, तर इतर नवं तंत्रज्ञानही बदलेल युजर्सचं अनुभवविश्व

येत्या काळात एआय तंत्रज्ञानाला मागणी निश्चितच वाढणार आहे. त्याशिवाय अन्य अनेक तंत्रज्ञानांचा विकास होणार आहे. 2023मध्ये युझर्सचा अनुभव अधिक समृद्ध करू पाहणाऱ्या काही तंत्रज्ञानांविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 जानेवारी : गेल्या काही वर्षांत प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सुखकर झाल्या आहेत. बहुतांश क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञान विशेष चर्चेत आहे. या तंत्राचा वापरदेखील वाढत आहे. एआयच्या वापरामुळे अनेक क्षेत्रांतली कामं सोपी झाली आहेत. येत्या काळात एआय तंत्रज्ञानाला मागणी निश्चितच वाढणार आहे. त्याशिवाय अन्य अनेक तंत्रज्ञानांचा विकास होणार आहे. 2023मध्ये युझर्सचा अनुभव अधिक समृद्ध करू पाहणाऱ्या काही तंत्रज्ञानांविषयी सविस्तर जाणून घेऊ या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर वाढत आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञानदेखील विकसित होत आहे. आगामी काळ केवळ एआयचा नाही तर वेगवेगळ्या प्रगत तंत्रज्ञानाचाही असेल. यामुळे युझर्सचं अनुभवविश्व अधिक समृद्ध होईल. भविष्यातल्या प्रगत तंत्रज्ञानाचा विचार केला, तर नवीन G या अक्षरामध्ये बदल घडवण्याची मोठी ताकद आहे असं दिसून येतं. भारतात 5G लाँच झालं आहे. सध्या या नेटवर्कचा वापर मर्यादित युझर्स करत असले, तरी जसजसा या नेटवर्कचा वापर वाढेल तसा इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात IoT चा वापर वाढेल. मोबाइल, कम्प्युटरमधून इंटरनेट अनेक डिव्हाइसमध्ये जाऊन पोहोचेल. IoTमुळे स्मार्ट सिटी, रोबोटच्या मदतीने शेती करण्याची पद्धती, सेल्फ ड्रायव्हिंग हायवे सिस्टिम यांचा विकास होईल. उद्योग क्षेत्राचा विचार करता या दोन्हींमुळे व्यापार नक्कीच वाढेल. रिअल डाटा शेअरिंगमध्ये मोठा बदल होईल. 3D प्रिंटिंगला अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असंही म्हणतात. यात 3D ऑब्जेक्टला डिजिटल फाइलमधून लेअर बाय लेअर क्रिएट केलं जातं. हे एआयपेक्षा कमी वाटू शकतं; पण त्यातही भविष्यात बदल घडवण्याची क्षमता आहे. यामुळे उत्पादन क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. हेही वाचा :  प्रवासात आहात आणि Internet नाहीये? टेन्शन नॉट; आता इंटरनेटशिवायही काम करेल WhatsApp; कसं ते वाचा एक्स्टेंडेट रिअ‍ॅलिटी अर्थात XR हा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, ऑगमेटेंड रिअ‍ॅलिटी आणि मिक्स्ड रिअ‍ॅलिटीचं शॉर्ट व्हर्जन आहे. या तंत्रज्ञानामुळे युझर्सना अधिक इमर्सिव्ह अनुभव मिळेल. ब्रँड एंगेजमेंटसाठी हे तंत्रज्ञान वापरलं जाऊ शकतं. XR तंत्रज्ञानामुळे लोकांना जगाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल. या तंत्रज्ञानाचा वापर हळूहळू सुरू झाला आहे. मोबाइल बेस्ड Pokemon GO अ‍ॅपच्या लोकप्रियतेवरून या तंत्रज्ञानाच्या अनुभवाचा अंदाज येऊ शकतो. XRचा वापर मेटाव्हर्समधलं व्हर्च्युअल जग अधिक एक्सप्लोअर करण्याची संधीदेखील देईल. ह्युमन- कम्प्युटर इंटरफेसमुळे डिव्हाइस आणि टेक्नोलॉजी निर्मितीस मदत होते. स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर ही या तंत्रज्ञानाची सर्वोत्तम उदाहरणं आहेत. आरोग्याशी संबंधित डेटा स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर बँडमुळे अगदी सहजपणे कलेक्ट होतो. ही दोन्ही डिव्हाइसेस सहजपणे घालता येतात आणि या तंत्रामुळे अचूक माहिती मिळते; पण हे तंत्रज्ञान केवळ इथपर्यंत मर्यादित नाही. शूजपासून कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत ह्युमन -कम्प्युटर इंटरफेसचा वापर होईल. कोणतंही तंत्रज्ञान जितकं प्रगत होत जातं तितकं ते सूक्ष्म होत जातं, हे कोणत्याही तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. येत्या काळात ह्युमन-कम्प्युटर इंटरफेसमुळे स्मार्ट ग्लासची जागा स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स घेतील. त्यानंतर स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्सची जागा स्मार्ट आय इम्प्लाट घेऊ शकतं. हेही वाचा :  सोशल मीडियावर कसे कमावतात बक्कळ पैसे; Social media stars नीच सांगितलं सिक्रेट गेल्या वर्षी क्रिप्टोकरन्सी जोरदार चर्चेत होतं. नवीन वर्षातल्या तंत्रज्ञानाच्या यादीत क्रिप्टोकरन्सीचा समावेश नाही. असं असलं तरी त्यातल्या तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ब्लॉकचेन विकेंद्रित असल्याने ते कोणत्याही एका ठिकाणी कायमस्वरूपी साठवलं जात नाही. त्यामुळे रेकॉर्ड नष्ट होण्याची किंवा त्यात बदल होण्याची शक्यता उरत नाही. त्यामुळे येत्या काळात अनेक संस्था या तंत्राचा वापर डेटा स्टोअर करण्यासाठी करू शकतात. या तंत्रज्ञानाचा विशेष फायदा म्हणजे, तुमचा डेटा सरकार किंवा कोणतीही संस्था डिलीट करू शकत नाही. तसंच यामुळे डेटा हॅक होत नाही. याचा वापर हॉस्पिटल आणि स्टोअर्समध्ये आरोग्यविषयक डेटा स्टोअर करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसंच हे तंत्रज्ञान ऑनलाइन वेटिंग प्लॅटफॉर्मसाठी वापरलं जाऊ शकते. सायबर सिक्युरिटी अ‍ॅप्लिकेशनमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जाईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात