मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्ही वापरताय तशा SIM कार्डशिवाय लाँच होणार Apple iPhone 14, वाचा काय आहे हे e-SIM?

तुम्ही वापरताय तशा SIM कार्डशिवाय लाँच होणार Apple iPhone 14, वाचा काय आहे हे e-SIM?

अ‍ॅपल आपल्या नवीन आयफोन 14 सीरिजमधील फोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी ई-सिमचा (e-Sim in iPhone) पर्याय वापरणार आहे. भारतात एअरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) आणि जिओ (Jio) या तीनही टेलिकॉम कंपन्या ई-सिम सेवा ऑफर करतात.

अ‍ॅपल आपल्या नवीन आयफोन 14 सीरिजमधील फोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी ई-सिमचा (e-Sim in iPhone) पर्याय वापरणार आहे. भारतात एअरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) आणि जिओ (Jio) या तीनही टेलिकॉम कंपन्या ई-सिम सेवा ऑफर करतात.

अ‍ॅपल आपल्या नवीन आयफोन 14 सीरिजमधील फोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी ई-सिमचा (e-Sim in iPhone) पर्याय वापरणार आहे. भारतात एअरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) आणि जिओ (Jio) या तीनही टेलिकॉम कंपन्या ई-सिम सेवा ऑफर करतात.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी: अ‍ॅपल कंपनीच्या (Apple Company) आयफोन 15 सीरिजमध्ये (iPhone 15 Series) फिजिकल सिम कार्ड सपोर्ट (Physical Sim Card Support) नसेल. आयफोन 15 सीरीज 2023 मध्ये लॉंच होईल. आयफोन 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन ठरेल, अशी चर्चा होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल आयफोन 14 सीरिजमध्ये (Apple iPhone 14 Series) सिम कार्ड स्लॉट नसेल. अ‍ॅपल आपल्या नवीन आयफोन 14 सीरिजमधील फोनमध्ये सिम कार्ड स्लॉटऐवजी ई-सिमचा (e-Sim in iPhone) पर्याय वापरणार आहे. भारतात एअरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) आणि जिओ (Jio) या तीनही टेलिकॉम कंपन्या ई-सिम सेवा ऑफर करतात. अ‍ॅपल त्यांच्या पुढील सर्व सीरिज वॉटरप्रुफ बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या कारणामुळेच आयफोन 14 सीरिजमध्ये ई-सिम दिले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात ई-सिम हा महत्त्वपूर्ण पर्याय युजर्सला उपलब्ध होऊ शकतो.

    हे वाचा-Alert! फ्री इंटरनेटच्या नावाखाली वसूली करतंय Facebook, तुम्हीही वापरताय का?

    अ‍ॅपलने यापूर्वीच ई-सिम फिचर असलेले स्मार्टफोन लॉंच केले आहेत. कंपनीने सर्वप्रथम iPhone XS आणि iPhone XS Max साठी ई-सिम फीचर लॉंच केले होते. नुकत्याच लॉंच झालेल्या आयफोन 13 सीरिजमध्ये कंपनीने फिजिकल सिम कार्ड स्लॉट व्यतिरिक्त ई-सिमचाही ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. या फोनमध्ये युजर दोन सिम कार्ड वापरू शकतात, त्यापैकी एक फिजिकल तर दुसरे ई-सिम कार्ड असेल. मात्र, नव्या आयफोन 14 सीरिजमध्ये केवळ ई-सिमचाच ऑप्शन उपलब्ध होईल, अशी चर्चा आहे.

    आता केवळ ई-सिम

    अ‍ॅपल आयफोन 14 सीरिजमध्ये ई-सिमचा ऑप्शन उपलब्ध होईल, अशी चर्चा आहे. तथापि, आयफोन 14 सीरिजचा एक प्रकार सिम कार्ड स्लॉटसह येऊ शकतो. जे टेलिकॉम ऑपरेटर ई-सिम सेवा देत नाहीत, त्यांच्यासाठी खासकरून हा प्रकार उपलब्ध करून दिला जाईल. कंपनी त्यांच्या पुढील सर्व सीरिज पूर्णपणे वॉटरप्रुफ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आयफोन 14 सीरिजमध्ये ई-सिम देण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. युजर्स आयफोन 14 सीरिजमधील फोनचा वापर पाण्यात बराच काळ करू शकतात, असं देखील सांगितलं जात आहे.

    हे वाचा-लवकरच येणार जगातील पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, देणार DSLR ला आव्हान

    ई-सिम म्हणजे काय?

    भारतात रिलायन्स जियो, व्होडाफोन -आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्या ई-सिम सुविधा देत आहेत. टेलिकॉम कंपन्या ई-सिम ओव्हर-द-एअर (Over-the -Air) अ‍ॅक्टिव्हेट करतात. ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये बसवण्यात आलेले व्हर्च्युअल सिम (Virtual Sim) असते. ई-सिम अगदी फिजिकल सिम कार्ड प्रमाणे काम करते. जर तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केला तर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कोणतेही अन्य सिमकार्ड घालावे लागणार नाही.

    First published: