मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /लवकरच येणार जगातील पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, Motorola देणार DSLR आव्हान

लवकरच येणार जगातील पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, Motorola देणार DSLR आव्हान

स्मार्टफोनचं जग हे सतत विस्तारत आहे. फक्त 6 इंचाच्या एका फोनमध्ये माणसाचं संपूर्ण जग सामावलंय, असं आज आपण म्हणू शकतो. स्मार्टफोन (Smartphone) आता कॅमेराच्या जगताला आव्हान देण्यासाठी तयार आहे.

स्मार्टफोनचं जग हे सतत विस्तारत आहे. फक्त 6 इंचाच्या एका फोनमध्ये माणसाचं संपूर्ण जग सामावलंय, असं आज आपण म्हणू शकतो. स्मार्टफोन (Smartphone) आता कॅमेराच्या जगताला आव्हान देण्यासाठी तयार आहे.

स्मार्टफोनचं जग हे सतत विस्तारत आहे. फक्त 6 इंचाच्या एका फोनमध्ये माणसाचं संपूर्ण जग सामावलंय, असं आज आपण म्हणू शकतो. स्मार्टफोन (Smartphone) आता कॅमेराच्या जगताला आव्हान देण्यासाठी तयार आहे.

    मुंबई, 28 जानेवारी-   स्मार्टफोनचं जग हे सतत विस्तारत आहे. फक्त 6 इंचाच्या एका फोनमध्ये माणसाचं संपूर्ण जग सामावलंय, असं आज आपण म्हणू शकतो. स्मार्टफोन (Smartphone) आता कॅमेराच्या जगताला आव्हान देण्यासाठी तयार आहे. स्मार्टफोन बनवणारी प्रसिद्ध कंपनी मोटोरोला लवकरच 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा फोन जून 22 च्या जवळपास लाँच होऊ शकतो.

    Motorola हा जगातील पहिला 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Frontier 22 (Motorola Frontier 22 Smartphone) च्या नावाने लाँच करण्याच्या तयारीला लागली आहे. सोशल मीडियावर मोटोरोलाच्या या स्मार्टफोनबाबतचा एक रिपोर्ट लीक झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, Motorola Frontier 22 मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 Plus प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सोबतच यामध्ये 12GB LPDDR5X RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजची क्षमता असू शकते.

    बाहेर आलेल्या रिपोर्टनुसार, मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा नवा प्रोसेसर पाहायला मिळू शकतो. हा फोन 6.67 इंचाच्या फुल एचडी प्लस (FHD+) AMOLED डिस्प्लेसोबत येईल. तसंच HDR 10+ चा सपोर्टही यात पाहायला मिळू शकतो. फोनचा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोटोरोला Frontier 22 मध्ये Android 12 वर आधारित MyUS ऑपरेटिंग सिस्टीम मिळेल.

    200MP चा प्रायमरी कॅमेरा-

    Motorola Frontier 22 स्मार्टफोनचं सर्वात भारी फीचर असेल याचा कॅमेरा. या स्मार्टफोनच्या कॅमेराविषयी बोलायचं झाल्यास, फोनच्या मागे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 200 मेगापिक्सेलचा असेल. यासोबत फोनमध्ये 50MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 12MP चा सुपर मायक्रो कॅमेराही दिला जाऊ शकतो. चर्चा आहे की, सेल्फीसाठी यामध्ये 60MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो.

    टेक एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, मोटोरोलाच्या या नव्या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग फीचर मिळू शकतं. असंही सांगितलं जात आहे की, या नव्या फोनमध्ये 125W क्षमतेचं वायर्ड चार्जिंगचं सपोर्ट सिस्टम असू शकतं. जर मोटोरोला फ्रंटियर 22 स्मार्टफोन 125W वायर्ड चार्जिंगसोबत आला तर हा जगातला सर्वांत जलद चार्जिंग होणाऱ्या मोबाईल्समध्ये सामील होईल.

    कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय 6E, यूएसबी टाईप-C पोर्ट, एनएफसी, जीपीएस आणि ब्लूटूथ व्हर्जन 5.2 दिलं जाऊ शकतं. याशिवाय फोनमध्ये तीन मायक्रोफोन आणि दोन स्टीरिओ स्पीकरही मिळतील. फोनमध्ये एक अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही असू शकतो.

    Moto G60 स्मार्टफोन-

    नुकतेच मोटोरोलाने दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. मोटोरोलाने मोटो जी 60 (Moto G60) आणि मोटो जी 40 फ्यूजन (Moto G40 Fusion) नावाने स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. दोन्ही स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर आणि 6000 एमएएच बॅटरीसोबत मिळत आहेत.

    मोटोरोलाच्या मोटो जी 60 स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर मोटो जी 40 मध्ये 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तुमच्या आवडीचा फोन निवडून तो खरेदी करा आणि फोटोग्राफीचा आनंद लुटा.

    First published:

    Tags: Camera, Smartphone, Technology