Home /News /technology /

आता Tata Sky चं झालं नामांतर; नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसह प्लानमध्ये मिळणार 'या' 13 OTT सेवा

आता Tata Sky चं झालं नामांतर; नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइमसह प्लानमध्ये मिळणार 'या' 13 OTT सेवा

टाटा स्काय (Tata Sky) या डायरेक्ट-टू-होम प्लॅटफॉर्मनं (Direct to Home Platform) स्वतःचं नामांतर केलं आहे. नामांतरासह कंपनीनं आपल्या पॅकेजमध्ये टेलिव्हिजन-कम-ओटीटीचा (Over-the-Top) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली, 27 जानेवारी:  टाटा स्काय (Tata Sky) या डायरेक्ट-टू-होम प्लॅटफॉर्मनं (Direct to Home Platform) स्वतःचं नामांतर केलं आहे. सर्वांना परिचित असणारं टाटा स्काय आता 'टाटा प्ले' (Tata Play) या नावानं सर्व्हिस देणार आहे. नामांतरासह कंपनीनं आपल्या पॅकेजमध्ये टेलिव्हिजन-कम-ओटीटीचा (Over-the-Top) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा प्लेनं नेटफ्लिक्स (Netflix), अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) आणि डिस्ने प्लस हॉटस्टारसह (Disney+ Hotstar) 13 ओटीटी प्लॅटफॉर्म्स आपल्या बिंज सर्व्हिसमध्ये समाविष्ट केले आहेत. 399 रुपये प्रति महिन्याचा हा कॉम्बो पॅक (Combo Pack) 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर या पॅकची जाहिरात अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे करणार आहेत. तर दक्षिणेतील राज्यांमध्ये जाहिरात करण्यासाठी आर. माधवन (R Madhavan) आणि प्रियामणी (Priyamani) यांची निवड करण्यात आली आहे. टाटा प्लेचे मॅनेजिंग डायरेक्टर (MD) आणि सीईओ (CEO) हरित नागपाल (Harit Nagpal) यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'बरेच लोक टेलिव्हिजनसोबतच ओटीटी कंटेटदेखील पाहतात. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेट (OTT Content) शोधणं आणि तो मॅनेज करणं कठीण गोष्ट आहे, असं कंपनीच्या लक्षात आलं आहे. म्हणून कंपनीची नवीन ब्रँड ओळख ग्राहकांच्या गरजांशी सुसंगत ठेवली आहे. टाटा प्ले आता फक्त डीटीएच प्लेयर (DTH Player) नाही तर लाइव्ह टेलिव्हिजन आणि ओटीटी सर्व्हिसदेखील प्रोव्हाईड करणार आहे.'

मुंबईत Google आणि CEO सुंदर पिचाईंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण

 टाटा प्लेची ही नवीन ऑफर 'फॅमिली प्रॉडक्ट' आहे. जेव्हा एकाच कुटुंबातील वेगवेगळे सदस्य टीव्ही पाहणार नाहीत, तेव्हा या कॉम्बो पॅकच्या मदतीनं त्यांना त्यांच्या आवडीचा कंटेट मोबाइल फोन किंवा मोठ्या स्क्रीनवर पाहता येईल. प्लॅनच्या किमती स्क्रीनची संख्या, डीटीएच कनेक्शन (DTH Connection) आणि सबस्क्रिप्शन घेतलेल्या पॅकनुसार बदलतील, असे तपशील नागपाल यांनी दिले.
व्हिजिट चार्ज रद्द करण्यात आला याशिवाय, टाटा प्लेनं आपला 175 रुपयांचा सर्व्हिस व्हिजिट चार्ज (Service Visit Charge) काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ज्या डीटीएच ग्राहकांनी त्यांचा पॅक रिचार्ज केला नाही ते देखील विनामूल्य री-कनेक्शन (Re-connection) मिळवू शकतात. 'टाटा प्ले' हे नाव आमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसच्या वाईड रेंजला रिप्रेझेंट करतं. कुटुंबांनी आपल्यासाठी चांगलं भविष्य निर्माण करावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही केलेले बदल हे त्याचाच परिणाम आहे,' असंही नागपाल यांनी सांगितलं.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Tata group

पुढील बातम्या