Home /News /news /

Vodafone चा खास बजेट प्लान, 200 रुपयांत मिळणार सर्व काही हातात

Vodafone चा खास बजेट प्लान, 200 रुपयांत मिळणार सर्व काही हातात

वोडाफोनने एक खास प्लॅन लाँच केला असून यामध्ये ग्राहकांना जास्त फायदा मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

    मुंबई, 27 जानेवारी: jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी आता vodafone आणि idea कंपनीने आता prepaid युझर्ससाठी चांगला प्लान पुन्हा एकदा रिलाँच केला आहे. कमी किमतीमध्ये ग्राहकांच्या खिशाला परवडणारा असा प्लान असल्यानं या प्लानला budget recharge plan असं नाव देण्यात आलं आहे. सध्या वोडाफोन कंपनीच्या नेटवर्कमध्ये खूप प्रॉब्लेम असल्यानं आणि महाग असल्यानं ग्राहक वोडाफोनकडून jio किंवा airtel कंपनीच्या सेवेत आपला नंबर पोर्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वोडाफोन कंपनीने आपल्या ग्राहकांच्या खिशाला परवडणारा असा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये काय आहे खास जाणून घेऊया. 199 budget recharge plan य़ा प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसोबत 1 GB डेटा आणि 100 SMS प्रतिदिवशी मिळणार आहेत. या प्लानची वैधता फक्त 21 दिवस असणार आहे. त्यामुळे युझर्सला एकूण 21 GB डेटा मिळणार आहे. Reliance Jio 149 Rupees Plan या प्लानमध्ये तुम्हाला जिओ ते जिओ unlimited free calling मिळणार आहे. 24 दिवसांसाठी हा प्लान वैध असणार आहे. 1 GB प्रतिदिन डेटा पॅक यानुसार 24 GB डेटा तुम्हाला मिळणार आहे. जिओ ते इतर नेटवर्कसाठी 24 दिवसांसाठी 300 मिनिटं फ्री मिळणार आहेत. यासोबत दरदिवसाला 100 SMS फ्री मिळणार आहेत. हेही वाचा-फक्त 1 रुपयात एक जीबी डेटा, जिओला टक्कर देतेय 'ही' कंपनी Airtel 149 Rupees Plan Airtel च्या ग्राहकांना प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. Airtel ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग फ्री असेल. 2 GB डेटा आणि 300 SMS प्रतिदिवशी फ्री मिळणार आहेत. Xstream आणि विंक म्यूजिकसारखे Applicationचं सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे. काय आहे बेस्ट सध्या वेडाफोन दिवसेंदिवस महाग होत चाललं आहे असं ग्राहकांचं म्हणणं आहे. यासोबतच नेटवर्कमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे ग्राहकांनी वोडाफोन कंपनीबाबात मोठी नाराजी व्यक्त केली आहे. असं असलं तरीही वोडाफोन आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तातील प्लान लाँच करत आहे. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला कॉलिंग आणि इतर सुविधांसाठी सेवा हवी असेल तर वोडाफोन-आयडिया सर्वात चांगलं आहे मात्र इंटरनेटसाठी विचार कराल तर jioची सुविधा चांगली असल्याचं युझर्सचं म्हणणं आहे. हेही वाचा-सावधान! हॅकर्सने शोधून काढला नवा फंडा, तुमची फक्त एक चूक पडू शकते महागात
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Mobile phone, Techonology, Vodafone, Vodafone idea tariff plan

    पुढील बातम्या