मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Vodafone-Idea ची एक चूक आणि युजरच्या अकाउंटमधून उडाले लाखो रुपये, तुम्हीही याबाबत राहा Alert

Vodafone-Idea ची एक चूक आणि युजरच्या अकाउंटमधून उडाले लाखो रुपये, तुम्हीही याबाबत राहा Alert

टेलिकॉम कंपनीने डॉक्युमेंट्स योग्यरित्या वेरिफाय केल्याशिवायच दुसऱ्याच व्यक्तीला मोबाईल नंबरसाठी डुप्लिकेट सीम दिल्यानंतर एका ग्राहकाने 68.5 लाख रुपये गमावले. त्यामुळे आता कंपनीच्या चुकीमुळे आयटी विभागाने त्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचं साांगितलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : राजस्थान सरकारच्या आयटी विभागाने Vodafone-Idea लिमिटेडला आपल्या ग्राहकाला 27,53,183 रुपये देण्यास सांगितले आहेत. टेलिकॉम कंपनीने डॉक्युमेंट्स योग्यरित्या वेरिफाय केल्याशिवायच दुसऱ्याच व्यक्तीला मोबाईल नंबरसाठी डुप्लिकेट सीम दिल्यानंतर एका ग्राहकाने 68.5 लाख रुपये गमावले. त्यामुळे आता कंपनीच्या चुकीमुळे आयटी विभागाने त्या व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचं साांगितलं आहे. 27,53,183 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी कंपनीला एक महिन्याची वेळ देण्यात आली आहे.

आरोपीने तक्रारदार कृष्ण लाल नैन यांना 44 लाख रुपये परत केले. तर 27.5 लाख रुपये परत केले नाहीत. आता वोडाफोन-आयडिया लिमिटेडला एक महिन्यात तक्रारदाराच्या बँक खात्यात 27,53,183 रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा वार्षिक 10 टक्क्यांच्या दराने कंपाउंड इंट्रेस्ट लावला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

कृष्ण लाल नैन यांचं सिम कार्ड 25 मे 2017 रोजी बंद झालं. त्यांनी एका वोडाफोन स्टोरशी संपर्क केला. दुसऱ्या दिवशी त्यांना नवं सिम कार्ड देण्यात आलं. 31 मे रोजी ते अॅक्टिव्हेट झालं. याचदरम्यान कृष्ण लाल नैन यांच्या नंबरसाठी डुप्लिकेट सिम अलवर नावाच्या व्यक्तीला दिलं गेलं. ज्यावेळी कृष्ण लाल यांचं सिम अॅक्टिव्हेट झालं, त्यावेळी टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांच्या नंबरवर पाठवण्यात आलेल्या OTP चा वापर करुन त्यांच्या खात्यातून 68.5 लाख रुपये काढण्यात आले.

MNP घोटाळा किंवा सिम स्वॅपिंगमुळे फसवणूक झाली, तर सरकार देणार भरपाई?

याप्रकरणी 2 जून 2017 रोजी FIR दाखल करण्यात आली. त्यानंतर असं समोर आलं, की टेलिकॉम कंपनीकडून एक डुप्लिकेट सिम कार्ड जारी करण्यात आलं. डुप्लिकेट सिम कार्डमुळे ऑनलाईन फ्रॉडद्वारे 68.5 लाख रुपये ग्राहकाने गमावले. त्यानंतर आरोपीने कृष्ण लाल नैन यांना 44 लाख रुपये परत केले.परंतु इतर रक्कम दिली नाही. मे 2020 मध्ये नैन यांनी आयटी नियमांतर्गत तक्रार दाखल केली. त्यात कंपनीकडून 34.50 लाख रुपये आणि 24.5 लाख न दिलेली रक्कम आणि व्याजाची मागणी केली. या प्रकरणी वोडाफोन-आयडियाला दोषी ठरवण्यात आलं आणि कंपनीला नुकसान भरपाई देण्याचं सांगिण्यात आलं.

First published:

Tags: Vodafone, Vodafone services