मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

MNP घोटाळा किंवा सिम स्वॅपिंगमुळे फसवणूक झाली, तर सरकार देणार भरपाई?

MNP घोटाळा किंवा सिम स्वॅपिंगमुळे फसवणूक झाली, तर सरकार देणार भरपाई?

सायबर गुन्हेगारांना एकदा एखाद्याच्या सिमचा अॅक्सेस (Sim Access) मिळाला, तर त्याच फोनच्या माध्यमातून बँक डिटेल्स (Bank Details) शोधले जातात.

सायबर गुन्हेगारांना एकदा एखाद्याच्या सिमचा अॅक्सेस (Sim Access) मिळाला, तर त्याच फोनच्या माध्यमातून बँक डिटेल्स (Bank Details) शोधले जातात.

सायबर गुन्हेगारांना एकदा एखाद्याच्या सिमचा अॅक्सेस (Sim Access) मिळाला, तर त्याच फोनच्या माध्यमातून बँक डिटेल्स (Bank Details) शोधले जातात.

 नवी दिल्ली, 15 सप्टेंबर: तंत्रज्ञान जसजसं विकसित होत आहे, तसतशा सोयीसुविधा वाढत आहेत; मात्र तंत्रज्ञानाचा वापर वाईट कामांसाठीही केला जात आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने केलेली फसवणूक (Cyber crime) सर्वसामान्य माणसाच्या पटकन लक्षातही येत नाही. ती लक्षात येईपर्यंत बरंच मोठं नुकसान झालेलं असतं. सिम स्वॅपिंग आणि मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीमध्ये (MNP Fraud) होणारे घोटाळे हे प्रकार त्यातलेच. अशा घोटाळ्यांच्या बाबतीत काही कृती करण्याचे अधिकार आतापर्यंत ग्राहकांना नव्हते. असं काही एखाद्याच्या बाबतीत घडलं, तर त्या ग्राहकाला TRAI कडे तक्रार न्यावी लागायची. TRAI कडेही त्या घोटाळ्याची उस्तवार करण्याची कोणतीही यंत्रणा नव्हती. त्यामुळे अशा तक्रारी पडूनच राहायच्या. आता मात्र दूरसंचार विभागाने या प्रकारांविरोधात कडक कारवाईचं पाऊल उचललं आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

सिम कार्ड स्वॅपिंग घोटाळा (Sim Car Swapping Fraud) करण्यासाठी सायबर गुन्हेगार कोणत्याही युझरच्या फोन नंबरचा म्हणजेच सिमचाच वापर करतात. ते टेलिकॉम सेवा पुरवठादारांच्या मदतीने रजिस्टर्ड मोबाइल नंबरचं दुसरं सिम घेतात. त्यामुळे तो नंबर ज्या व्यक्तीच्या नावावर असतो, त्याच्याकडे त्या नंबरचा कोणताच अधिकार राहत नाही आणि त्याच्या नावावरचं कार्ड भलतीच व्यक्ती म्हणजे तो सायबर गुन्हेगार वापरू लागतो. त्यामुळे URN, OTP वगैरे सर्व मेसेजेस त्या गुन्हेगारांनाच मिळत राहतात. त्याच्या साह्याने गुन्हेगार बँकेशी संबंधित कोणताही व्यवहार पूर्ण करू शकतात. त्यामुळे ग्राहकाचं नुकसान होतं.

11 रुपयांचा हा रिचार्ज करताना सावधान, फोन Hack होण्याचा धोका

सायबर गुन्हेगारांना एकदा एखाद्याच्या सिमचा अॅक्सेस (Sim Access) मिळाला, तर त्याच फोनच्या माध्यमातून बँक डिटेल्स (Bank Details) शोधले जातात. त्यासंदर्भातली व्हेरिफिकेशन्सही त्याच नंबरवरून केली जातात. हे सगळं ग्राहकाच्याच नंबरवरून होत असल्यामुळे कोणाला शंकाही येत नाही. मूळ ग्राहकाला मात्र यातलं काहीच माहिती नसतं. बँकेचा ओटीपी किंवा मेसेज किंवा काहीच येत नसल्यामुळे बँकेकडे तक्रार केल्यानंतर हे सारं लक्षात येतं. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो.

आता डेस्कटॉपवरही गुगल युझर्सना वापरता येणार ‘डार्क मोड’, जाणून घ्या पद्धत

देशात सिम स्वॅपिंग आणि मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी करताना घोटाळे करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. हे दोन्ही प्रकारचे घोटाळे मोबाइल कंपन्यांच्या सहकार्याशिवाय होणार नाहीत, असं मानलं जातं. मोबाइल कंपन्यांचे कर्मचारीही यात सामील असतात, असं मानलं जातं. म्हणूनच दूरसंचार विभागाने या प्रकारांची सखोल तपासणी करण्याची आणि दोषी मोबाइल ऑपरेटर्सवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर दूरसंचार अर्थात टेलिकॉम विभाग यासाठी लायसेन्स सर्व्हिस एरियाच्या ( LSA) अधिकाऱ्यांना निर्देश देईल. LSA च्या टर्म सेलकडून या घोटाळ्याचा तपास केला जाईल. कोणत्या मोबाइल पुरवठादाराकडून तो झालेला आहे, याचा शोध घेतला जाईल. कंपनी दोषी आढळल्यास त्या पुरवठादार कंपनीविरोधात एक अहवाल टेलिकॉम विभागाला पाठवला जाईल. त्या अहवालाच्या आधारे टेलिकॉम विभाग संबंधित मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीवर कारवाई करील आणि युझरचं सिम कार्ड स्वॅपिंगद्वारे झालेलं नुकसान भरून देता येऊ शकेल. घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

First published:

Tags: Cyber crime, Sim