• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Vodafone Idea ने लॉन्च केले जबरदस्त Prepaid Plans, ग्राहकांना मोफत मिळणार Disney+ Hotstar आणि बरंच काही...

Vodafone Idea ने लॉन्च केले जबरदस्त Prepaid Plans, ग्राहकांना मोफत मिळणार Disney+ Hotstar आणि बरंच काही...

वोडाफोन आयडियाने ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन प्रीपेड प्लान लॉन्च केले असून, यातून ग्राहकांना निश्चितच अधिकाधिक सुविधा मिळणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 सप्टेंबर : मोबाइल (Mobile) युजर्सला आकर्षित करण्यासाठी आघाडीच्या मोबाईल नेटवर्क कंपन्या (Mobile network Companies) विविध ऑफर्ससह अनेक प्लान (Plans) सातत्याने आणत असतात. या माध्यमातून ग्राहक संख्या वाढवणं हा या कंपन्यांचा उद्देश असतो. आज या कंपन्या आपल्या मूलभूत सुविधांसह ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) सबस्क्रिप्शन सुविधा प्लान्सच्या माध्यमातून देत आहेत. याच पार्श्वभूमीवर व्हीआय (Vi) म्हणजेच व्होडाफोन आयडिया (Vodaphone - Idea) कंपनीनं आपल्या ग्राहकांना प्रीपेड प्लान अंतर्गत काही धमाकेदार ऑफर्स देऊ केल्या आहेत. व्होडाफोन – आयडिया कंपनीनं आपला प्रीपेड रिचार्ज (Prepaid Recharge) पोर्टफोलिओ एका वर्षासाठी Disney+Hotstar सबस्क्रिप्शनसह अपडेट केला आहे. व्होडाफोन – आयडियाचे हे नवे प्लान 501 रुपयांपासून सुरू होत असून, ते 2595 रुपयांपर्यंत आहेत. कंपनीने आपल्या जुन्या प्रीपेड प्लान्समध्ये Disney+Hotstar Mobile सुविधा समाविष्ट केली आहे. 499 रुपयांचा प्लान या प्लानमध्ये युजर्सना Disney+Hotstar व्यतिरिक्त इंटरनेट डेटा, अलिमिटेड कॉल्ससह एसएमएस सुविधा मिळणार आहे. व्हीआयने 499 रुपयांच्या एक वर्षासाठीच्या Disney+Hotstar Mobile सबस्क्रिप्शन सह चार नवीन प्रीपेड प्लान्स आणले आहेत. व्यवसायासाठी गाडी खरेदीचा विचार करताय, Tata Ace Gold Petrol CX ठरतोय चांगला पर्याय 501 रुपयांचा प्लान व्होडाफोन – आयडियाच्या 501 रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि 3 जीबी हायस्पीड डेटा मिळेल. त्यासोबतच 16 जीबीचा अतिरिक्त डेटा देखील युजर्सना देण्यात येणार आहे. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध असेल. 601 रुपयांचा प्लान या नव्या प्रीपेड प्लान्ससह कंपनीने 601 रूपयांचा डेटा ॲडऑन पॅकदेखील Disney+Hotstar Mobile सुविधेसह सादर केला आहे. यात युजर्सना 75 जीबी मोबाईल डेटा मिळणार असून, त्यासाठी कोणतीही निश्चित वैधता नसेल. 701 रुपयांचा प्लान या शिवाय कंपनीकडून 701 रूपयांच्या प्लानसोबत युजर्सना Disney+Hotstar Mobile ही सुविधा एका वर्षासाठी मिळणार असून, या व्यतिरिक्त दररोज 100 एसएमएस, 3 जीबी डेटा (Data) आणि 56 दिवसांपर्यंत 56 जीबी अतिरिक्त डेटाही दिला जाणार आहे. Railway चा नवा नियम, आता ट्रेन तिकीट कॅन्सल न करताच बदलता येणार प्रवासाची तारीख 901 रुपयांचा प्लान व्हीआयच्या 901 रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल्स, दररोज 100 एसएमएस, 3 जीबी डेटा आणि 48 जीबी अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. या प्लानची वैधता 84 दिवसांची असेल. ज्या युजर्सला लॉंग टर्म प्लान हवा आहे, त्यांच्यासाठी कंपनीने 2595 रूपयांचा आकर्षक प्लान आणला आहे. या प्लानची वैधता 365 दिवस असेल. या प्लाननुसार युजर्सला दररोज 1.5 जीबी डेटा, दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. व्होडाफोन आयडियाने ग्राहकांच्या गरजेनुसार नवीन प्रीपेड प्लान लॉंच केले असून, यातून ग्राहकांना निश्चितच अधिकाधिक सुविधा मिळणार आहेत. तसेच गरजेनुसार प्लान निवडीचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
  First published: